Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर बाजार समितीत कांदा आवक वाढली उच्च प्रतीच्या कांद्याच्या भावात वाढ

Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर बाजार समितीत कांदा आवक वाढली उच्च प्रतीच्या कांद्याच्या भावात वाढ

Kanda Bajar Bhav : Onion arrivals increased in Srirampur Bazaar Committee Increase in price of high quality onions | Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर बाजार समितीत कांदा आवक वाढली उच्च प्रतीच्या कांद्याच्या भावात वाढ

Kanda Bajar Bhav : श्रीरामपूर बाजार समितीत कांदा आवक वाढली उच्च प्रतीच्या कांद्याच्या भावात वाढ

येथील बाजार समितीत सोमवारी ४६०० कांदा गोण्यांची आवक झाली. ५८ वाहनातून मोकळा कांदा लिलावासाठी दाखल झाला. उच्च श्रेणीच्या कांद्यास सर्वाधिक ४६७५ रुपये भाव मिळाला.

येथील बाजार समितीत सोमवारी ४६०० कांदा गोण्यांची आवक झाली. ५८ वाहनातून मोकळा कांदा लिलावासाठी दाखल झाला. उच्च श्रेणीच्या कांद्यास सर्वाधिक ४६७५ रुपये भाव मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

श्रीरामपूर : येथील बाजार समितीत सोमवारी ४६०० कांदा गोण्यांची आवक झाली. ५८ वाहनातून मोकळा कांदा लिलावासाठी दाखल झाला. उच्च श्रेणीच्या कांद्यास सर्वाधिक ४६७५ रुपये भाव मिळाला.

कसा मिळतोय बाजारभाव
प्रथम श्रेणीचा कांदा ४२०० ते ४६०० रुपये 
द्वितीय श्रेणीला ३५०० ते ४१५० रुपये 
तृतीय श्रेणीला २४०० ते ३४५० रुपये 
गोल्टीला ३५०० ते ४४०० रुपये 
खाद ७०० ते १९५० रुपये 
मोकळा कांदा प्रथम श्रेणीचा ४३७० ते ४६७५ रुपये दराने विक्री झाला.

कांद्याची आवक गत सप्ताहापेक्षा वाढती आहे. भाव मात्र स्थिर होते. पावसामुळे कांद्याच्या प्रतवारीमध्ये फरक पडतो. त्यामुळे भावात फरक दिसत असला तरी उच्च प्रतीच्या कांद्याचे भाव चांगले निघाले.

शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा झाकण्यात धावपळ झाली. तसेच सोमवारी दुपारी झालेल्या पावसाचाही फटका बसला आहे.

Web Title: Kanda Bajar Bhav : Onion arrivals increased in Srirampur Bazaar Committee Increase in price of high quality onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.