Join us

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:19 IST

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने घटल्याने भावात ५०० रुपयांची वाढ झाली.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये लसूण, हिरवी मिरची व काकडीची विक्रमी आवक झाली. कारली, आले व बटाट्याचे भाव स्थिर राहिले आहेत.

बाजारात ओल्या भुईमूग शेंगांची आवक सुरू झाली आहे, तसेच पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत. एकूण उलाढाल ५ कोटी ९० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने घटल्याने भावात ५०० रुपयांची वाढ झाली.

कांद्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवरून ३ हजार रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १ हजार क्विंटलने घटूनही कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिर राहिले.

लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १५ क्विंटलने वाढल्याने भावात ८ हजार रुपयांची घट झाली. लसणाचा कमाल भाव २५,००० रुपयांवरून १७ हजार रुपयांवर स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक ३८२ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. ओल्या भुईमूग शेंगांची एकूण आवक ३ क्विंटल झाली असून, या शेंगांना ८ हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला.

शेतीमाल आवक व बाजारभावकांदाएकूण आवक : ४,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) ३,००० रुपये.भाव क्रमांक २) २,५०० रुपये.भाव क्रमांक ३) २,००० रुपये.

बटाटाएकूण आवक : १,५०० क्विंटल.भाव क्रमांक १) २,००० रुपये.भाव क्रमांक २) १,५०० रुपये.भाव क्रमांक ३) १,३०० रुपये.

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचाकणबाजारमार्केट यार्डशेतकरीमिरचीबटाटा