Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता

Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता

Kanda Bajar Bhav : Onion prices are hike due to decrease in the arrivals in Chakan market. There is a possibility of further price increase | Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता

Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता

कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शेअर :

Join us
Join usNext

चाकण : कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे.

नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणाच्या काळात कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी घसरलेले कांद्याचे दर आवक घटत गेल्याने पुन्हा वाढू लागले आहेत. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारत तालुक्यासह लगतच्या जिल्ह्यांतून कांद्याची आवक होत आहे.

घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ४० ते ४५ रुपये दर मिळत आहे. बाजारात रोज हजार ते बाराशे पिशवींची आवक होत आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत आवक कमी राहणार आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कांद्याचे घाऊक दर किलोला ५४, तर किरकोळ दर किलोला सत्तर रुपये असे आहेत आणि दहा किलोस ४५० आणि ७०० रुपये या प्रमाणे आहेत, असे बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या सूत्रांनी सांगितले.

कांद्याचे घाऊक दर किलोला ५४, तर किरकोळ दर किलोला सत्तर रुपये असे आहेत. दहा किलोस ४५० आणि ७०० रुपये या प्रमाणे आहेत, असे बाजारपेठेतील व्यापारी वर्गाच्या सूत्रांनी सांगितले.

जुन्या कांद्याचा दर्जा चांगला
वखारीत साठवणूक केलेल्या जुन्या कांद्याची सध्या आवक सुरू आहे. या कांद्याचा दर्जा चांगला आहे. डिसेंबरमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू होते. तोपर्यंत जुनाच कांदा बाजारात असेल. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये प्रतिकिलो असून, दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

परराज्यांतून वाढत आहे मागणी
-
कांद्याला परराज्यातून मोठी मागणी आहे. कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांतून मागणी होत असल्याने मार्केट यार्डातून कांदा दक्षिण भारतात जात आहे. पुढील महिन्यात कर्नाटकात नवीन कांदा येणार आहे. त्यामुळे तेथून काही प्रमाणात मागणी कमी होईल.
- मात्र, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशातून मागणी कायम असणार आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचा दर पुढील काही महिने तेजीत असेल, असे कांद्याचे व्यापारी सांगत आहेत.

चाकण बाजारात सध्या कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या वाखारीत साठवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. मर्यादित आवक होत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. डिसेंबर महिन्यात नवीन कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे भाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कांदा शंभरी गाठू शकतो. - संभाजी कलवडे, कांदा-बटाटा आडतदार

Web Title: Kanda Bajar Bhav : Onion prices are hike due to decrease in the arrivals in Chakan market. There is a possibility of further price increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.