दौंड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. दरम्यान, जुना कांदा प्रतिकिलो ६६ रुपये, तर नवीन कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये भाव मिळाला.
गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव घसरले होते. मात्र, चालू आठवड्यात कांद्याला भाव मिळाले नाहीत. लिंबाच्या आवकेसह बाजारभाव स्थिर निघाले.
दौंड येथील मुख्य आवारात पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले आहेत. दौंड, केडगाव, यवत, पाटस येथे भुसार मालाची आवक कमी झाली असून, बाजारभाव तेजीत निघाले.
दौंड येथे पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले आहेत. कोबी, वांगी, काकडी, कारली, शिमला, फ्लॉवर, वांगी, घेवडा, आद्रक आदी भाज्यांचे भाव तेजीत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, सचिव मोहन काटे यांनी दिली.
उपबाजार केडगाव बाजारभाव
गहू (एचएफक्यू) - २,७०० ते ३,३०१
ज्वारी - २,२०० ते ३,८००
बाजरी - २,२०० ते ३,५००
हरभरा - ५,५०० ते ६,५००
मका - १,९०० ते २,२५०
उडीद - ५,५०० ते ७,५००
मुग - ५,६०० ते ७,०००
कांदा - ९,००० ते ६,६००
लिंबू - ५१० ते १,२१०