Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : Solapur Market Committee 91 truckloads of red onion arrival price increased again read more | Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समिती ९१ ट्रक लाल कांद्याची आवक दर पुन्हा वाढला वाचा सविस्तर

मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे. बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर पाच हजारांपर्यंत खाली आला होता. गुरुवारी हा दर पुन्हा साडेपाच हजारांवर पोहोचला आहे

मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे. बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर पाच हजारांपर्यंत खाली आला होता. गुरुवारी हा दर पुन्हा साडेपाच हजारांवर पोहोचला आहे

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे. बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर पाच हजारांपर्यंत खाली आला होता. गुरुवारी हा दर पुन्हा साडेपाच हजारांवर पोहोचला आहे. येत्या दिवाळीपर्यंत वाढीव भाव कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वर्षभर असते. त्यामुळे पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात माल सोलापूर मार्केटमध्ये येतो.

शिवाय सोलापुरात कांद्याला दरही इतर बाजार समितीच्या तुलनेत कायमच चांगला मिळतो. सोलापूर जिल्ह्यामध्येही खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.

दिवाळीनंतर साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यातून नवीन कांदा बाजार येतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत दर स्थिर राहणार आहे. केंद्र सरकारने आता निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दर वाढत आहे.

मागील आठ ते दहा दिवसांपासून दर पाच हजारांच्या आसपासच आहे. सरासरी दरही ४ हजारांच्या घरात आहे. येत्या पुढील महिनाभार दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकातील पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे.

याशिवाय मागील वर्षापासून सातारा जिल्ह्यातील कांदाही सोलापूरला येत आहे. याशिवाय द्यापही पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील जुना कांदा विक्रीला येत आहे.

डिसेंबरपासून मोठी आवक
डिसेंबर महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यंदा लागवड क्षेत्र वाढल्यामुळे दर वर्षाच्या तुलनेत डिसेंबरपासून आवक वाढणार आहे. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या काळात जवळपास १००० ट्रक कांद्याची आवक असते. त्यामुळे यार्डातील माल बाहेर काढण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात. त्यामुळे तीन महिने कांद्याची मोठी आवक राहणार आहे.

बुधवारी आवक वाढली होती. त्यामुळे कांद्याची दरात ५०० रुपयांची घट झाली होती. गुरुवारी पुन्हा दर वाढला आहे. पुढील काही दिवस दर स्थिर राहणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड आणि कर्नाटकातून नवीन माल येत आहे. सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांचा कांदा नोव्हेंबर महिन्यानंतर विक्रीला येईल. - नामदेव शेजाळ, कांदा विभागप्रमुख

Web Title: Kanda Bajar Bhav : Solapur Market Committee 91 truckloads of red onion arrival price increased again read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.