Join us

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत कांद्याच्या दरात अचानक वाढ कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 10:14 AM

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी कांद्याचा कमाल दर पाच हजारांपर्यंत होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांत आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी कांद्याचा कमाल दर पाच हजारांपर्यंत होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांत आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे.

मंगळवारी कमाल दर सात हजार रुपयांपर्यंत मिळाला आहे. शिवाय सरासरी दरातही दुपटीने वाढ झाली आहे. सोलापूर बाजार समितीत आता जुन्या कांद्याबरोबर नवीन कांद्याची आवक वाढली आहे.

दिवाळीला तीन दिवस सुट्टी असल्याने २९ ऑक्टोबर रोजी तब्बल ७६१ ट्रक कांद्याची आवक होती.  तेव्हा सरासरी दरात मोठी घसरण झाली होती. प्रतिक्विंटल १६०० रुपये सरासरी दर मिळाला.

आता दिवाळी सुट्टीनंतर आवक वाढण्याची शक्यता होती; मात्र दर पडल्याने शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणलेला नाही.  त्यामुळे सोमवारी ३१३ ट्रक कांद्याची आवक झाली.

कमाल दर ६२२५ रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तसेच सरासरी दरातही दुपटीने म्हणजे दीड हजारांवरुन ३००० रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी ३०८ ट्रक कांद्याची आवक होती.

सोमवारच्या तुलनेत पुन्हा दरात वाढ झाली. मंगळवारी कमाल दर ७१०० रुपये मिळाला. तर सरासरी दर ३१०० रुपये होता. अचानक आवक घटल्याने दर वाढल्याचे सांगण्यात आले.

आता आवक आणखी वाढणारसोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा आता विक्रीला येत आहे. त्यामुळे पुढील चार महिने आवक मोठी राहणार आहे. दररोज सरासरी ५०० ट्रक कांद्याची आवक राहण्याची शक्यता आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी बाजार समितीकडून नियोजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी कच्चा माल विक्रीला आणू नये, असे आवाहन करण्यात आले.

अधिक वाचा: Shet Rasta Kayda : शेतात जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण झालंय यासाठी कुठे कराल अर्ज?

टॅग्स :कांदासोलापूरबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती