मंचर : आवक कमी झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. ५) दहा किलो कांद्याला ६११ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत २ हजार ८४५ पिशवी कांद्याची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या दहा किलो कांद्याला ६११ या दर मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या बराखीतील कांदा संपत आल्यामुळे आणि परतीच्या पावसाने नवीन कांद्याचे नुकसान झाले.
दीपावली सणामुळे बाजार आवारात कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे कांद्याचे बाजारभावात वाढ झाल्याची माहिती व्यापारी बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी दिली.
कांद्याचे दर पुढीलप्रमाणेसुपर लॉट १ नंबर गोळा कांद्यास रुपये ६०० ते ६११ रुपयेसुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ५८० ते ६०० रुपयेसुपर मीडियम २ नंबर कांद्यास ५३० ते ५८० रुपयेगोल्टी कांद्यास ३५० ते ४५० रुपयेबदला कांद्यास २०० ते ३२० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.