घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ४ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला तसेच सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला.
उपबाजारात मागील आठवड्याच्या तुलनेने आवक वाढली असून कांद्याला मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. बुधवारी बाजार समितीत एकूण ४२ हजार ३२४ कांदा गोण्यांची आवक झाली होती.
बुधवारी झालेल्या लिलावात एक दोन लॉट प्रतिक्विंटल ४ हजार ८०० त्यानंतर मोठा कांदा ४३०० ते ४५००, मुक्कल भारी ४००० ते ४२००, गोल्टी ३९०० ते ४१००, जोड कांदा १५०० ते ३५०० रुपये भाव मिळाला.
सध्या राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. असाच पाऊस राहिला तर आगामी येणाऱ्या लाल कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने कांद्याच्या दरात भविष्यात सुधारणा होऊ शकते. - किशोर विधाते, कांदा आडतदार