Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर

Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर

Kanda Bajarbhav: In the market committees onion arrival half, the price of onion goes to four thousand | Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर

Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर

श्रीरामपूर बाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याला ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल दर मिळाले. काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत.

श्रीरामपूर बाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याला ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल दर मिळाले. काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

श्रीरामपूर : नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांत कांद्याचे दर चार हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. समित्यांमध्ये कांद्याची आवक ही सरासरीपेक्षा निम्म्याने घटली आहे. त्यामुळे पुढील काळातही दर चांगले राहतील अशी शक्यता आहे.

श्रीरामपूरबाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याला ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल दर मिळाले. काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.

नाशिकनंतर नगर जिल्ह्यात कांद्याचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात पाच ते सहा लाख गोण्यांची आवक होत असते. यंदा मात्र पाण्याअभावी उत्पादनात मोठी घट झाली आहे.

त्यामुळे आवक अवधी अडीच ते तीन लाख गोण्यांची होत आहे, अशी माहिती येथील समितीचे सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली. लाल कांद्याच्या उत्पादनास अजूनही मोठा अवधी आहे. त्यातच जास्त पावसामुळे लाल कांदा खराब कांद्याचे अंदाज होण्याची भीती आहे.

त्यामुळे दर आणखी वाढतील असा आहे. दक्षिण भारतातील कांदा उत्पादनाला अजून महिनाभराचा अवकाश आहे. त्यामुळे कांद्याचे दर पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जातील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सरकारी हस्तक्षेपाची भीती
नाफेडकडे तीन लाख मेट्रिक टन कांद्याचा साठा आहे. त्यामुळे कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. सरकारकडून नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास दर कमी होऊ शकतात. त्यामुळे पुढील काळात सरकारकडून काय पावले उचलली जातात, याकडे लक्ष आहे. अन्यथा कांदा पाच हजार रुपये क्विंटलवर सहजपणे जाईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा: Kanda Bajarbhav : सोलापूर बाजार समितीत १९२ ट्रक कांदा आवक जुना कांदा खातोय भाव

Web Title: Kanda Bajarbhav: In the market committees onion arrival half, the price of onion goes to four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.