Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

Kanda Bajarbhav : Onion fetched the highest price in Manchar market | Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

Kanda Bajarbhav : मंचर मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मंचरःमंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला. १६ हजार १०० पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ५३५ या उच्चांकी भावाने विकला गेला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

मंचर मुख्य बाजार आवारात मंगळवारी १६ हजार १०० कांदा पिशव्याची आवक झाली. मे. इंदोरे आणि कंपनी आडतदार योगेश इंदोरे यांच्या आडत गाळ्यावर शेतकरी संदीप भगवान थोरात चांडोली खुर्द यांच्या कांद्याला दहा किलोस ५३५ रुपये असा आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला.

आवक कमी असल्याने व उत्तर भारतात कांद्याला मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात एवढी उच्चांकी वाढ झाल्याचे बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी सांगितले.

कांद्याचे दर पुढीलप्रमाणे
गोळे कांदे ३३२ पिशवी सुपर लॉट १ नंबर गोळा कांद्यास रुपये ५०० ते ५३५ रुपये, सुपर गोळा कांदे १ नंबर रुपये ४७० ते ५०० रुपये, सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ४२० ते ४७० रुपये गोल्टी कांद्यास ३५० ते ४२० रुपये, बदला कांद्यास १८० ते ३०० रुपये असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, या भावाने शेतकरी समाधान व्यक्त करत होते.

Web Title: Kanda Bajarbhav : Onion fetched the highest price in Manchar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.