Join us

Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी मिळाला किती भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 10:47 AM

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात शनिवार रोजी झालेल्या लिलावात एक दोन वक्कलसाठी ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला.

घोडेगाव : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात शनिवार रोजी झालेल्या लिलावात एक दोन वक्कलसाठी ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला, तर सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० तीनशे रुपये भाव मिळाला.

केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना (एनसीसीएफ) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने (नाफेड) खरेदी केलेल्या कांद्याची ३५ रुपये किलो दराने बाजारात विक्री सुरू केली.

त्यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, त्याचा परिणाम कांदा बाजार भावावर काहीशा प्रमाणावरच झाला.

आवक घटली. कांद्याला मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने दर स्थिर राहिले. शनिवारी बाजार समितीत एकूण ३२ हजार २८५ कांदा गोण्यांची आवक झाली होती.

शनिवारी झालेल्या लिलावात एक दोन लॉट प्रतिक्विंटल ४ हजार ६०० त्यानंतर मोठा कांदा ४३०० ते ४४००, भारी ४००० ते ४१०० गोल्टी ३८०० ते ४१००, जोड कांदा १५०० ते ३५०० रुपये, असा भाव मिळाल्याचे आडत व्यापारी संभाजी पवार यांनी सांगितले.

जरी केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना (एनसीसीएफ) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने (नाफेड) खरेदी केलेल्या कांद्याची ३५ रुपये किलो दराने बाजारात विक्री करण्याचे ठरवले असले तरी कांदा खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातच बाजारात मागणी मोठी असल्याने नाफेडच्या कांद्याचा बाजारभावावर खूप मोठा परिणाम होईल, असे वाटत नाही. - संभाजी पवार, कांदा आडतदार, घोडेगाव, ता. नेवासा

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनेवासाकेंद्र सरकार