Join us

Kanda Batata Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बटाटा आवक मंदावली; कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:30 IST

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १००० क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव ५००० रुपयांवर स्थिरावला.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, टोमॅटो व फ्लॉवरची उच्चांकी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव कोसळले आहेत, गेल्या महिन्यापासून ओल्या भुईमूग शेंगाची आवक झाली नाही. ५ कोटी ६० लाख रुपये एकूण उलाढाल झाली आहे.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १००० क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव ५००० रुपयांवर स्थिरावला.

बटाट्याची एकूण आवक १,७५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ७५० क्विंटलने घटली. बटाट्याचा कमाल भाव ३,८०० रुपयांवर स्थिरावला, लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भाव ३१०० रुपयांवर स्थिरावला, हिरव्या मिरचीची एकूण आवक २३० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. ओल्या भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही.

शेतीमालाची आवक व बाजारभावकांदाएकूण आवक २,५०० क्विंटलभाव क्रमांक १) ५,००० रुपयेभाव क्रमांक २) ३,५०० रुपयेभाव क्रमांक ३) २,००० रुपयेबटाटाआवक १,७५० क्विंटलभाव क्रमांक १) ३,८०० रुपयेभाव क्रमांक २) २,७५० रुपयेभाव क्रमांक ३) २,००० रुपये

अधिक वाचा: दोन पॉलिहाऊस अन् ६५ शेडनेट, इंदापूर तालुक्यातील ह्या गावाला शेडनेटचं गाव म्हणून ओळख

टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीखेडचाकणपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकांदाबटाटा