चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले.
वाटाणा व हिरव्या मिरचीची विक्रमी आवक झाली. चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने त्यांचे भाव कोसळले आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून जळगाव भुईमूग शेंगा व ओल्या भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल ६ कोटी २० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ६,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही ४,००० क्विंटलने वाढल्याने कांद्याचे भाव ५०० रुपयांनी घसरले. कांद्याचा कमाल भाव २,५०० रुपयांवर आला. बटाट्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक १० क्विंटल झाली. लसणाचा कमाल भावही २५,००० रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३५५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयांपासून ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कांदा बाजारभाव
एकूण आवक - ६,००० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,५०० रुपये.
भाव क्रमांक २) २,२०० रुपये.
भाव क्रमांक ३) १,००० रुपये.
बटाटा बाजारभाव
एकूण आवक - २,५०० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,००० रुपये.
भाव क्रमांक २) १,५०० रुपये.
भाव क्रमांक ३) ८०० रुपये.
अधिक वाचा: Keli Bajar Bhav : केळीला अच्छे दिन; मागील महिन्याच्या तुलनेत केळीला मिळतोय दुप्पट दर