Join us

Kanda Bajar Bhav : बाजारात आवक कमी तरीही दर स्थिर; वाचा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 17:43 IST

Onion Market Rate Today : राज्यात आज सोमवार (दि.१४) रोजी एकूण ३७१५४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४० क्विंटल लाल, ७१७८ क्विंटल लोकल, ४०० क्विंटल पोळ, २६९२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्यात आज सोमवार (दि.१४) रोजी एकूण ३७१५४ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४० क्विंटल लाल, ७१७८ क्विंटल लोकल, ४०० क्विंटल पोळ, २६९२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज अनेक बाजारात लिलाव बंद असल्याने आवक कमी प्रमाणात दिसून आली. 

बाजारात आज उन्हाळ कांद्याला सरासरी १००० ते १३०० रुपयांचा दर मिळाला. ज्यात सर्वाधिक आवक असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ५०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तर लासलगाव येथे ११७५, लासलगाव-निफाड येथे १२०१, लासलगाव-विंचुर येथे ११६० रुपयांचा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला.

पोळ कांद्याला आज पिंपळगाव बसवंत येथे ९०० तर लाल कांद्याला लासलगाव - निफाड येथे ७०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

तसेच लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ६०० तर सरासरी १००० रुपयांचा दर मिळाला. तर पुणे-पिंपरी येथे १४५०, पुणे-मोशी येथे ८००, मंगळवेढा येथे १००० रुपयांचा दर मिळाला. या सोबतच कोल्हापूर व राहुरी-वांबोरी येथे कांद्याला आज ९०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/04/2025
कोल्हापूर---क्विंटल19105001500900
राहूरी -वांबोरी---क्विंटल9672001300900
लासलगाव - निफाडलालक्विंटल40601881700
पुणेलोकलक्विंटल652060014001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12130016001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल3203001300800
मंगळवेढालोकलक्विंटल32620014001000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल400675999900
लासलगावउन्हाळीक्विंटल615570014801175
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल393080013001201
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल384460013511160
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1300050015621200
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्ड