श्रीरामपूर : सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविल्याचा तत्काळ परिणाम बाजारात दिसून आला. येथील बाजार समितीत बुधवारी १६९६ कांदा गोणीची आवक झाली.
तर मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये ४४ वाहनांतून आवक आली होती. कांद्याची आवक वाढती असून, भाव तेजीत राहिले आहेत.
गोणीतील कांद्यात सर्वोत्कृष्ट कांदा वक्कलास १,८०० सर्वाधिक भाव मिळाला, तर मोकळा कांदा लिलावात सर्वोत्कृष्ट कांद्यास १,५५५ रुपये भाव लिलावात मिळाला.
गोणीतील कांदा- प्रथम श्रेणीचा कांदा १६५० ते १८००- द्वितीय श्रेणीचा कांदा १३०० ते १६००- तृतीय श्रेणीचा १०० ते १२५०- गोल्टी ११०० ते १६०० रुपये प्रती क्विंटलने लिलावात विकला गेला आहे.
मोकळा कांदा- प्रथम श्रेणीचा १४०० ते १५५५- द्वितीय श्रेणीचा १२०० ते १३५०- तृतीय श्रेणीचा १००० ते ११५०- गोल्टी १२०० ते १४०० दराने विकला गेला.
अधिक वाचा: राज्यातील या १५ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश; साखर विकून पैसे देणार?