kapus kharedi : बदनापूर (Badnapur) येथील भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्या खरेदी केंद्राच्या वतीने यंदा १ लाख २० हजार ७१३ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. हे खरेदी केंद्र (जिनिंग) राज्यात प्रथम क्रमांकाचे केंद्र ठरले आहे. (kapus kharedi)
तालुक्यातील सणासुदीसाठी शेतकरी कापूस विक्री करण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांचे उंबरठे झिजवत असताना येथील जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या एका कापसाच्या जिनिंगमध्ये ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सीसीआयचे हे कापूस खरेदी (kapus kharedi) केंद्र सुरू करण्यात आले होते.
शेतकऱ्यांना खासगी बाजारापेक्षा येथे कापसाचा योग्य दर मिळाल्यामुळे या खरेदी केंद्रामध्ये कापसाच्या (kapus kharedi) वाहनाची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवसात दररोज आलेल्या कापसाच्या वाहनांना बाजार समितीचे आवारात रात्रंदिवस नोंद घेऊन ही वाहने नंबरनुसार रांगेत उभे केले. त्यानंतर खरेदी केंद्रामध्ये मागणीप्रमाणे कापसाची वाहने मोजमापासाठी पाठविले जाते. (kapus kharedi)
या नियोजनामुळे अन्य केंद्रापेक्षा शेतकऱ्यांच्या कापसाचे मोजमाप लवकर होत. त्यामुळे खरेदी केंद्रात या तालुक्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक झाल्याने त्यांचा कापूस देखील खरेदी करण्यात आल्याने हे केंद्र एक नंबरवर आले आहे.(kapus kharedi)
जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सीसीआयचे हे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.
शेतकरी वर्गातून समाधान
सीसीआय केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस वेळेवर खरेदी झाल्यामुळे बदनापूर परिसरातील शेतकरी वर्गातूनदेखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उपमहाप्रबंधक यांची भेट
* भारतीय कापूस महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपमहाप्रबंधक स्वप्निल दडमल यांनी १३ मार्च रोजी बाजार समिती कार्यालयात भेट दिली.
* येथील कामकाजाबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी सीसीआय खरेदी केंद्रात आणण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचेदेखील आवाहन केले. यावेळी प्रशासक उमेशचंद्र हुसे, सचिव सुरेश जिगे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.