Kapus Kharedi : कापसाला हमीभावदेखील मिळत नसताना सीसीआयद्वारा नोंदणीसाठी १५ तारीख देण्यात आली आहे. त्यातही १४ व १५ तारखेला सार्वजनिक सुटी आल्याने १३ मार्च ही डेडलाइन राहील. त्यामुळे पांढरं सोनं मातीमोल भावात विकल्या जाणार आहे. (Kapus Kharedi)
काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक केली आहे. केंद्र शासनाने कापसाला यंदा ७५२१ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला. प्रत्यक्षात खुल्या बाजारात ७००० रुपयांच्या दरम्यान तर खेडा खरेदीत त्यापेक्षा कमी भाव मिळालेला आहे. (Kapus Kharedi)
शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देण्यासाठी सीसीआयने जिल्ह्यातील ९ केंद्रांवर खरेदी सुरू केली. जेवढे दिवस केली केली, त्यापेक्षा जास्त दिवस काहींना ना काही कारणाने केंद्र बंद राहिली व खरेदीची मंद गती राहिली आहे. (Kapus Kharedi)
याशिवाय खेडा खरेदीत कापसाची लूट झालेली आहे. सीसीआयद्वारा कापसाच्या खरेदीत दोन महिन्यापासून ग्रेड कमी केलेले आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा १०० रुपयांनी कमी म्हणजेच ७,४२१ रुपयांनी कापसाची खरेदी होत आहे. (Kapus Kharedi)
त्वचा विकार
शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक करत आहे. मात्र, या कापसातील किडींमुळे घरातील व्यक्तींच्या त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आदी समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे बाजारात भाव नाही, साठवणूक करावी तर आरोग्याच्या समस्या उदभवत आहेत. अशा परिस्थितीत दुहेरी कैचीत शेतकरी सापडला आहे.
साठवणुकीस जागा नाही
सीसीआयद्वारा जिल्ह्यातील काही जिनिंगसोबत करार केल्याने तेथे केंद्र सुरू करण्यात आली. मात्र, काही केंद्रांवर गठाण व सरकीची उचल न झाल्याने कापूस ठेवायला जागा नाही शिवाय रुईच्या उताऱ्याचाही प्रश्न समोर येत आहे. प्रत्यक्षात सीसीआय खरेदी करेल तोवर जिनिंग उपलब्ध करून देण्यात येईल, असा करार असल्याची माहिती आहे.
खासगी खरेदीचे भाव (रु/क्विं)
२८ फेब्रुवारी | ७०७५ ते ७४०० |
०३ मार्च | ७०७५ ते ७४२५ |
०५ मार्च | ७००० ते ७३२५ |
०७ मार्च | ७०५० ते ७४०० |
१० मार्च | ७१०० ते ७४२५ |