Lokmat Agro >बाजारहाट > कात्या हरभऱ्यासह गार्डा, लाल व स्थानिक जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे मिळतोय...

कात्या हरभऱ्यासह गार्डा, लाल व स्थानिक जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे मिळतोय...

Katya gram along with garda, red and local varieties of gram are getting per quintal... | कात्या हरभऱ्यासह गार्डा, लाल व स्थानिक जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे मिळतोय...

कात्या हरभऱ्यासह गार्डा, लाल व स्थानिक जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे मिळतोय...

आज नंदूरबार बाजारसमितीत हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळाला.

आज नंदूरबार बाजारसमितीत हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज हरभऱ्याची ८ हजार ९१४ क्विंटल एवढी आवक झाली.  पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज विविध बाजारसमितीमध्ये स्थानिक हरभऱ्यासह लाल, गार्डी, कात्या, हायब्रीड हरभऱ्याची मोठी आवक झाली. 

आज नंदुरबारबाजारसमितीत हरभऱ्याला क्विंटलमागे सर्वाधिक ८०५६ रुपये सर्वसाधारण भाव मिळाला. तर उर्वरित ठिकाणी हरभऱ्याला साधारण ४५०० ते ५७०० रुपयांचा भाव मिळत आहे. लाल हरभऱ्याला  तब्बल ९५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

उर्वरित बाजारसमितीत हरभऱ्याला चांगला भाव मिळत असून नवीन हरभऱ्याची आवक काहीशी मंदावली आहे. धाराशिवच्या कात्या हरभऱ्याला आज बाजारात क्विंटलमागे साधारण ५७५० रुपये भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा लाल हरभरा ६१७१ ते ६४५१ रुपयांदरम्यान विकला गेला.

अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक हरभऱ्याची आवक झाली. यावेळी ३ हजार ११७ क्विंटल स्थानिक हरभरा बाजारपेठेत दाखल झाला होता. परभणीत लाल जातीच्या हरभऱ्याला ५७०० रुपये क्विंटलमागे दर मिळाला.

जाणून घ्या कोणत्या बाजारपेठेत काय मिळतोय भाव..

जिल्हाजात/प्रतीआवककमी दरकर्मचारी जास्त दरमूल्य दर
२४/०४/२०२४
अहमदनगर----५७००५७००५७००
अहमदनगरलाल29५७००५७००५७००
अकोलास्थानिक1488५१०८६२३०५७८५
अमरावतीस्थानिक3117५७५०6000५८७५
बीडलाल112४३००४६००४५१८
भंडारालाल121५९००५९००५९००
बुलढाणास्थानिक114000५४००५३००
बुलढाणाचाफा३६७५४००६१००५७५०
चंद्रपूरलाल३८५१००५७००५४००
छत्रपती संभाजीनगरहायब्रिड३७४७००५७००५६७०
धाराशिवगार्डा6५७००५७००५७००
धाराशिवकात्या४५५७००५८००५७५०
धाराशिवलाल५६५८९१६४५१६१७१
धुळे----11५६६१8001७९११
हिंगोलीलाल७६५६५०५९००५७७५
जळगावहायब्रिड116५२३३६७७०५५९०
जळगावचाफा1571५६१८५७५०५७२५
जळगावकाबुली५६७८००७८५०७८००
जळगावधीट२५८७८००७८००७८००
जालनास्थानिक१९५५००५८००५७५०
लातूरलाल३४५९०१६०८१५९९९
मुंबईस्थानिक३४९५८००८५००7500
नंदुरबार----६७०७८००82428056
परभणीक्रमांक १23५७००५७५०५७००
परभणीलाल50५७००५८९०५८००
पुणे----४१६५००७२००६८५०
सोलापूरस्थानिक६५५५००६२८०५९००
वर्धालाल147५२००५८१०५५००
राज्य एकूण आवक (Qtl.)८९१४

Web Title: Katya gram along with garda, red and local varieties of gram are getting per quintal...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.