Join us

keli bhajar bhav : नवीन केळी बाजारात दाखल; हा मिळतोय दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 2:29 PM

केळीच्या नवीन बागा सुरु झाल्याने आता बाजारात केळी काय भाव मिळत आहे ते वाचा सविस्तर (keli bhajar bhav)

keli bhajar bhav:

वसमत : सप्टेंबर महिन्यात केळीचे दोन हजारांवर दर गेले होते; परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दर गडगडले आहेत. केळीला मागणी कमी होताच दर दोन हजारांवरून १ हजार ६०० वर आले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे विक्रमी उत्पादन काढणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सप्टेंबर महिन्यात केळीला दोन हजार रुपयांपर्यंत समाधानकारक दर मिळाला. हे दर टिकून राहतील, अशी आशा शेतकरी व व्यापाऱ्यांना होती.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केळीचे दर गडगडले असून दोन हजारांवरून १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर केळीला मिळत आहेत. ८ ते १० दिवसांतच क्विंटल मागे शेतकऱ्यांना ४०० रुपयांचा फटका बसला आहे.

तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, सोमठाणा, किन्होळा, बोरगाव, नेहरूनगर आदींसह कळमनुरीत तालुक्यातील दांडेगाव, डोंगरखडा या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतात.परंतु, दर उतरल्याने फटका बसला आहे.

उत्पन्नवाढीसाठी खर्च करावा लागतो अधिक

चार हजार केळीची बाग आहे. लागवड खर्च जास्त प्रमाणात लागतो. उत्पन्न वाढीसाठी खर्च करावा लागतो. दर चांगले मिळाले तरच चार पैसे उरतील. सध्या केळीला प्रति क्विटल १६०० दर मिळत आहेत. यापूर्वी दोन हजारांचा दर मिळत होता. दर गडगडले असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. - बाबूराव शेवाळकर, शेतकरी

केळीला मागणी कमी झाली आहे. नवीन बागा सुरू झाल्या. त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. भविष्यात केळीचे दर वाढतील. सध्या दरात मंदी आली आहे. -असद शेख नूर, व्यापारी

मागणी कमी होताच दर घसरले

सप्टेंबर महिन्यात केळीला मोठी मागणी होती आणि दरही दोन हजारांवर गेले होते. नवीन बागांची सुरुवात होताच केळीचे दर घसरले आहेत. आठ दिवसांपूर्वी दोन हजारांचा दर मिळत होता ते आता १ हजार ६०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रकेळीफळेशेतकरीशेतीमार्केट यार्डहिंगोली