सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. अमेरिका, ब्राझील, अर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होत असतो. पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने सोयाबीनच्या भविष्यातील बाजारभावांचा अंदाज दिला आहे.
यंदा सोयातेलाची अशी आहे स्थिती
चालू वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत देशात ३.०२ लाख टन सोयातेलाची आयात झाली आहे. ही आयात मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. (स्रोत: SEA अहवाल, १८ जानेवारी २०२४).
भारतात सन २०२३-२४ मध्ये सोयाबीनचे उत्पादन ११० लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तीवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ११ टक्केनी कमी आहे. (स्रोत: WASDE, USDA, जानेवारी २०२४)
पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषिविषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत ॲग्रोचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा. त्यासाठी या निळ्या रेषेवर क्लिक करार.
यंदा उत्पादन असे असेल
मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात सोयाबीनची मासिक बाजारात आवक ऑक्टोबर महिन्यात जास्त होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून आवक कमी झाली आहे. (स्रोत: Agmarknet)
अमेरिकन कृषी विभागाच्या (WASDE, जानेवारी २०२३) अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये जगात ३९८८ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्केनी (३७४३ लाख टन, २०२२-२३) अधिक आहे.
न २०२२-२३ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १२.११ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सोयापेंड निर्यात जास्त झाली आहे झाली. (स्रोत: SEA अहवाल)
याआधीच्या किंमती अशा होत्या
मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. (स्रोत: Agmarknet). मागील तीन वर्षातील एप्रिल ते जून या कालावधीतील महिन्यातील सरासरी किमती खालील प्रमाणे होत्या:
एप्रिल ते जून २०२१: रु. ७०७९ प्रती क़्विटल.
एप्रिल ते जून २०२२: रु. ६९३० प्रती क्विटल.
एप्रिल ते जून २०२३: रु. ५०५६ प्रती क्विटल.
लातूर बाजारातील संभाव्य किंमती
सन २०२३-२४ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत रु. ४६०० प्रती क्विटल आहे. वरील सर्व माहितीचे विश्लेषण करून बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे यांनी एप्रिल ते जून २०२४: या कालावधीसाठी सोयाबीनचे बाजारभाव रु.४७०० ते ५२००रु. प्रती क़्विटल राहण्याची शक्यता वर्तविली आहे. सदर संभाव्य किमत अंदाज हा FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी आहे.
अधिक माहितीसाठी
बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्ष, पुणे
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प,
एम.एस.एफ.सी बिल्डींग, २७० भाम्बुर्डा, नारायण एस.बी.मार्ग, सिंबायोसिस कॉलेज, गोखले नगर, पुणे ४११०१६ फोनः ०२०-२५६५६५७७, टोल फ्रीः १८०० २१० १७७०