Join us

पंतप्रधानांच्या सभेआधी पिंपळगाव-लासलगावला कांद्याला किती बाजारभाव मिळतोय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 2:27 PM

लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान कांदा पट्ट्यातील महत्त्वाचे बाजारकेंद्र असणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे १५ मे रोजी सभा घेणार आहे. त्या सभेची तयारी सुरू आहे. कांद्याच्या भाव कमी असल्याने कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. वेळेवर निर्यात खुली केली नाही आणि जेव्हा निर्यात खुली केली, तेव्हा त्यात अटीच जास्त ठेवल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे कांदा बाजारभाव पुन्हा गडगडण्यावर होत आहेत. उद्याच्या पंतप्रधानांच्या सभेच्या आधी कांद्याचे काय भाव आहेत ते जाणून घेऊ यात.

आज चांदवड बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला किमान ६०० रुपये तर सरासरी १४८० रु. प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. उद्या दिनांक १५ मे रोजी येथील कांदा लिलाव सुरू राहतील असे बाजारसमितीने कळवले आहे.

पिंपळगाव बसवंत बाजारसमितीच्या सायखेडा उपबाजारात आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी ९०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. गोल्टी कांद्याला कमीत कमी ३०० तर खाद कांद्याला कमीत कमी २०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

येवला-अंदरसूल बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची सकाळच्या सत्रात ५०० क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कांद्याला कमीत कमी ३०० व सरासरी १३०० रुपये बाजारभाव मिळाला.

लासलगाव विंचूर बाजारसमितीत आज दिनांक १४ मे रोजी सकाळच्या सत्रात कांद्याची १० हजार ७०० क्विंटल आवक झाली.  या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव ७५० रुपये, तर सरासरी १६५० रु प्रति क्विंटल असे होते.जाणून घ्या दिनांक १४ मे २४ चे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
राहूरी---क्विंटल137271001800950
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल276150017001100
पुणेलोकलक्विंटल1071660020001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल11100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल24120018001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल3785001200850
इस्लामपूरलोकलक्विंटल50100020001550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50030015311300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1070075021511650
मनमाडउन्हाळीक्विंटल200030018611570
टॅग्स :कांदानरेंद्र मोदीबाजारशेतकरीशेती क्षेत्र