Join us

उन्हाचा पारा आणि कांद्याचा तोरा वाढला; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 2:58 PM

लासलगाव, पिंपळगाव, येवला, पुणे, पंढरपूर याठिकाणी आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कांदा बाजारभाव असे आहेत.

परतीच्या पावसानंतर उन्हाचा पारा वाढत असताना, बाजारात कांद्याचा तोराही वाढत आहे.  शेतकऱ्यांजवळचा उन्हाळी कांद्याचा साठा आता कमी होत चालला असून मागील काही दिवसांपासून बाजारात होणारी उन्हाळ कांद्याची आवकही घसरताना दिसत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना बाजारभावांच्या रुपात मिळत आहे.

आज दिनांक १७ ऑक्टोबर २३ रोजी लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याची ४ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव १५०० रुपये तर सरासरी कांदा बाजारभाव ३१ रुपये प्रति क्विंटल असे होते. 

पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याची १३ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी कांदा बाजारभाव ३०५१ असे होते.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील काही बाजारसमित्यांमध्ये अजूनही पूर्ण क्षमतेने लाल कांदा आवक होत नसून दसऱ्यानंतर लाल कांद्याची आवक नियमित सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाच्या ताणाचा फटका बसल्याने सर्वच पिकांवर परिणाम झाला असून कांदा उत्पादनही घटणार असल्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे लाल कांद्याच्या उपलब्धतेवरही होणार आहे.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील १७ ऑक्टोबरचे कांदा बाजारभाव (रुपये/प्रती क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 

छत्रपती

संभाजीनगर

---153140026001500

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---10319150031002300
पंढरपूरलाल16840030001900
पुणेलोकल10723150035002500
पुणे -पिंपरीलोकल2240030002700
पुणे-मोशीलोकल378150028002150
येवला -अंदरसूलउन्हाळी250060035053100
लासलगाव - विंचूरउन्हाळी4000150034013100
सिन्नर - नायगावउन्हाळी486150034373250
मनमाडउन्हाळी3000100035003000
पिंपळगाव बसवंतउन्हाळी13050140036123051
भुसावळउन्हाळी2180020002000
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीखरीपबाजार