Join us

जाणून घ्या आजचे कांदा-सोयाबीन-कापसाचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 8:38 PM

गारपिटीसह झालेल्या पावसामुळे नाशिक, नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांमध्ये उभ्या पिकांचे आणि साठवून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गारपिटीसह झालेल्या पावसामुळे नाशिक, नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांमध्ये उभ्या पिकांचे आणि साठवून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा चाळीतील कांदा, शेतातील लावलेला कांदा आणि कांद्याचे रोपही वाया गेल्यामुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमी होऊन दर वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यातील विविध ठिकाणी कापसाचेही नुकसान झाले आहे. तर आजच्या बाजारभावाच विचार केला तर कांदा, कापूस, तूर, सोयाबीनचे दर साधारण किंवा स्थिर होते. आज ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर सोयाबीनला मिळाला. तर ५ हजार २०० वरून हा सरासरी दर काहीसा घसरल्याचं चित्र आहे. 

कांद्याला आज २ हजार २०० रूपये ते ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. तर येणाऱ्या काळात कांद्याचे दर काहीसे वाढणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कापसाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर वाढण्यास पोषक वातावरण असूनही कापसाचे दर स्थिर आहेत. पाकिस्तानमध्ये यंदा कापसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तर ब्राझील, अमेरिका सारख्या देशात उत्पादन कमी झाले आहे.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2023
राहता---क्विंटल16479150404950
धुळेहायब्रीडक्विंटल13437548354835
सोलापूरलोकलक्विंटल96490050604940
कोपरगावलोकलक्विंटल43462749274900
लातूरपिवळाक्विंटल27997480051005000
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल64490050515000
अकोलापिवळाक्विंटल2355400052005000
अक्कलकोटपिवळाक्विंटल20470050004900
उमरखेडपिवळाक्विंटल50470049004800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल200470049004800
काटोलपिवळाक्विंटल100410050304500

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2023
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल8650040002500
सोलापूरलालक्विंटल4292610050002800
बारामतीलालक्विंटल329100037002500
लासलगावलालक्विंटल3900250047474101
लासलगाव - निफाडलालक्विंटल150150045514299
राहूरी -वांबोरीलालक्विंटल97730045003200
संगमनेरलालक्विंटल437070050003306
पुणेलोकलक्विंटल7291200040003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5200040003000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल77300040003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल277100035002250
मंगळवेढालोकलक्विंटल36730030002500
नाशिकपोळक्विंटल367300042513800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल10000250148364300
येवलाउन्हाळीक्विंटल3000180046994100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल1000200047204300
नाशिकउन्हाळीक्विंटल638250040003500
लासलगावउन्हाळीक्विंटल4506180052604260
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल230285545524200
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल91730045003200
संगमनेरउन्हाळीक्विंटल48850045002500
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल14629100045003800
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3500200050254401
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल890270049004500

 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2023
संगमनेर---क्विंटल105600070006500
वडवणी---क्विंटल94702571507125
काटोललोकलक्विंटल260700071117050
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड