Join us

आज कुठल्या मार्केटमध्ये सोयाबीनने खाल्ला भाव, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 3:20 PM

आज शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव (soyabean price) असे आहेत.

सुरूवातीला पावसाने ओढ दिली, नंतर काही ठिकाणी पुरामुळे शेतात पाणी साचलं, त्यामुळे सोयाबीनचं उत्पादन यंदा घटलं आहे. काही ठिकाणी शेंगा गळती झाली, तर पिवळ्या मोझॅक रोगानं शेतकऱ्यांचं नुकसान केलं. अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीनचं उत्पादन मोठ्या कष्टानं घेऊन दाखवलं.

आता मागच्या काही दिवसांपासून सोयाबीन बाजारात विक्रीला यायला सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही हवा तसा भाव मिळत नाहीये. शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव  मिळेल अशी अपेक्षा असल्याने अनेकांनी सध्या सोयाबीन बाजारात आणायचे नाही, असा वेट ॲन्ड वॉचचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आज दिनांक ७ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीने लिलाव झाले. लातूर बाजारपेठेत आज सोयाबीन पोटलीचा भाव ४६०० रुपये असा होता.

हिंगोली बाजारपेठेत सोयाबीनला सरासरी ४३७५ असा भाव मिळाला. भोकरदनच्या बाजारपेठेत आज सोयाबीनने चांगलाच भाव खाल्याचे दिसून आले. आज या ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची १४ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४८०० रुपये, जास्तीत जास्त ५ हजार रुपये, तर सरासरी ४९०० रुपये प्रति क्विंटल असे होते.

राज्यातील सोयाबीनचे निवडक बाजारभाव आज असे आहेत:

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण दर
जळगाव - मसावत---क्विंटल28390039003900
अमरावतीलोकलक्विंटल3378440045764488
हिंगोलीलोकलक्विंटल505418045704375
चोपडापांढराक्विंटल350300144264152
अकोलापिवळाक्विंटल1540410044704400
चिखलीपिवळाक्विंटल356420045004350
पैठणपिवळाक्विंटल4392039203920
भोकरदनपिवळाक्विंटल14480050004900
भोकरपिवळाक्विंटल3422544454335
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600428044954330
परतूरपिवळाक्विंटल178450046204600
औराद शहाजानीपिवळाक्विंटल231456046884624
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल135400045004300
आष्टी-जालनापिवळाक्विंटल44418045004400
टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरी