कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी गुळाचे सौदे पूर्ववत सुरू झाले. दरात प्रतिक्विंटल सरासरी दोनशे रुपयांची वाढ झाली असून ३८०० ते ४६०० रुपयापर्यंत दर पोहचला आहे. सोमवारी दरात घसरण झाल्याच्या रागातून शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले होते.
गुळाच्या हंगामाने गती घेतल्याने बाजार समितीत गुळाची आवक वाढली आहे. त्यात, साखर कारखान्यांचा हंगाम अडकल्याने शेतकऱ्यांना गुऱ्हाळघरांचा पर्याय राहिला. त्यामुळेही गूळ मार्केटमध्ये आवक वाढली.
त्यात रविवारी सौद्याला सुटी असल्याने सोमवारी आवक दीडपट झाली होती. त्यामुळे दर घसरले आणि शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. चर्चेनंतर मंगळवारी सौदे सुरू झाले.
आवक अधिक असूनही दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. ३० किलो व्याचे दर प्रतिक्विंटल ३८०० ते ४६०० रुपयांपर्यंत राहिला. तर एक किलो बॉक्सचा दर प्रतिक्विंटल ३५२५ ते ४२०० रूपयांपर्यंत राहिला.
बाजार समितीतील गुळाची आवक व दर
वजन | आवक | दर | सरासरी दर |
३० किलो | ९२३० रवे | ३८०० ते ४६०० | ४००० |
१ किलो | ९४३५ बॉक्स | ३५२५ ते ४२०० | ३८०० |
अधिक वाचा: CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किती हवा म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देईल वाचा सविस्तर