Lokmat Agro >बाजारहाट > Kothimbir Market : नाशिकच्या शेतकऱ्यास 205 कोथिंबीर जुड्यांचे 'इतके' रुपये मिळाले, वाचा आजचे बाजारभाव 

Kothimbir Market : नाशिकच्या शेतकऱ्यास 205 कोथिंबीर जुड्यांचे 'इतके' रुपये मिळाले, वाचा आजचे बाजारभाव 

Kothimbir Market: Nashik Farmer Gets 'So Much' For 205 Coriander Seeds, Read Today's Market Prices  | Kothimbir Market : नाशिकच्या शेतकऱ्यास 205 कोथिंबीर जुड्यांचे 'इतके' रुपये मिळाले, वाचा आजचे बाजारभाव 

Kothimbir Market : नाशिकच्या शेतकऱ्यास 205 कोथिंबीर जुड्यांचे 'इतके' रुपये मिळाले, वाचा आजचे बाजारभाव 

Kothimbir Market : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबीर दराने बाजारभाव तेजी कायम ठेवली.

Kothimbir Market : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबीर दराने बाजारभाव तेजी कायम ठेवली.

शेअर :

Join us
Join usNext

Kothimbir Market : गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातील कोथिंबीर (Coriander Market) उभे पीक खराब झाल्याने आवक घटली आहे. परिणामी कोथिंबीर बाजार तेजीत आले असून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबीर दराने बाजारभाव तेजी कायम ठेवली. सद्यस्थितीत जुडीला  ३५० ते ४००  रुपये दर मिळत आहे. तर क्विंटलला सरासरी ४० हजार रुपये दर मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीच्या दरात तेजी असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा येथील शेतकरी दिगंबर बोडके यांनी आणलेल्या कोथिंबीर २०५ जुड्यांना बाजार समितीत ४०० रुपये प्रतिजुडी दराने २०५ जुड्यांचे ८२ हजार रुपये मिळाले. तर कोथिंबीर रविवारी लिलाव प्रक्रियेत शेकडा किमान साडे सहा हजार तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये दर मिळाला. बाजार समितीत सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर भागांतून पालेभाज्या व फळभाज्या विक्रीसाठी आणण्यात येत आहेत. 

बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल मुंबई शहर तसेच मुंबई उपनगरात व गुजरात अहमदाबादला रवाना केला जातो तर काही प्रमाणात स्थानिक व्यापारी विक्रीसाठी शेतमाल खरेदी करतात. या आठवड्यात कोथिंबीर दराने सुरुवातीला साडेचारशे त्यानंतर ४८० व रविवारी ४०० रुपये प्रति जुडी असा दर कायम टिकवून ठेवला आहे.

वाचा आजचे बाजारभाव 
आज कोथिंबीरीला राज्यातील बाजार समितीमध्ये कोल्हापूर बाजारात क्विंटल १६ हजार ५०० रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात सरासरी 06 हजार रुपये, पाटण बाजारात प्रति नग २५ रुपये, श्रीरामपूर बाजारात प्रति नग ४० रुपये, कल्याण बाजारात प्रति नग ८०  रुपये, पुणे बाजारात प्रति नग ३५ रुपये तर काल क्विंटलला २४ हजार रुपये म्हणजेच जुडीला २४० रुपये सरासरी दर मिळाला.

Web Title: Kothimbir Market: Nashik Farmer Gets 'So Much' For 205 Coriander Seeds, Read Today's Market Prices 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.