Join us

Tur Kharedi Kendra : जळगाव जिल्ह्यात १६ केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी, हमीभाव मिळणार का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:06 IST

Tur Kharedi Kendra : पणन अधिकाऱ्यानी जिल्ह्यात १६ केंद्रांवर तूर खरेदीसाठी (tur Kharedi Nondni) नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जळगाव : शासकीय हमीभावाने तूर खरेदी (Tur Kharedi) व्हावी, अशी मागणी महिन्याभरापासून होत होती. त्यानुसार राज्य सहकारी पणन महासंघाचे (राज्य मार्केटिंग फेडरेशन) जिल्हा प्र. पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी जिल्ह्यात १६ केंद्रांवर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने तूर खरेदी केली जाणार आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना (Tur Farmers) मोठा दिलासा मिळणार आहे.

पणन विभागाने ७ रोजी याबाबत आदेशाचे पत्र दिले आहे. यात नोंदणी २४ जानेवारीपासून पुढे ४० दिवस करता येणार आहे. मात्र हे पत्र ७ फेब्रुवारी जारी करण्यात आले आहे. शासनाने तुरीचा हमीभाव ७५५० रुपये जाहीर केला आहे. बाजार समितीत प्रतिक्विंटल ६५०० रुपये असे भाव आहे. हमीभाव (Tur MSP) आणि प्रत्यक्ष दर यात एक हजार रुपयांचा फरक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ही आहेत १६ केंद्रएरंडोल शेतकरी संघ (केंद्र, अमळनेर), शेतकरी संघ पारोळा (केंद्र, पारोळा), चोपडा शेतकरी संघ, पारोळा (केंद्र, चोपडा), एरंडोल शेतकरी संघ (केंद्र, धरणगाव), कै. साहेबराव पाटील फुटसेल सोसा. लि. पाळधी (केंद्र, कासोदा), जळगाव शेतकरी संघ (केंद्र, म्हसावद), जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संस्था, (केंद्र, जळगाव),

भुसावळ शेतकरी संघ लि. (केंद्र, भुसावळ), कोरपावली वि. का. सेवा सोसायटी (केंद्र, यावल), रावेर शेतकरी संघ (केंद्र, रावेर), मुक्ताईनगर शेतकरी संघ (केंद्र, मुक्ताईनगर), बोदवड परचेस अॅण्ड सेल युनिट (केंद्र, बोदवड), शेतकरी सहकारी संघ जामनेर (केंद्र, जामनेर), शेतकरी संघ पाचोरा (केंद्र, पाचोरा), शेतकरी संघ भडगाव (केंद्र, भडगाव), शेतकरी संघ चाळीसगाव (केंद्र, चाळीसगाव).

शासन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करीत आहे, ही शेतकऱ्यांसाठी समाधानकारक बाब आहे. केंद्र सरकारच्या रुपये ७५५० रुपये या हमीभावावर शेजारच्या कर्नाटक राज्याने ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.- दिनेश पाटील, पळासखेड मिराचे ता. जामनेर.

टॅग्स :तुराशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड