खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा व बटाट्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली.
चाकणबाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव कोसळले. जनावरांच्या बाजारात जर्सी गायींच्या संख्येत घट झाली आहे. एकूण उलाढाल ५ कोटी ६० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ८,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३ हजार ५०० क्विंटलने वाढल्याने भावात ४०० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव २००० रुपयर्यावरून १ हजार ६०० रुपयांवर आला.
बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३५० क्विंटलने वाढूनही बटाट्याचा कमाल भाव १०० रुपयांनी वाढला. बटाट्याला २,००० रुपये पोहोचला.
लसणाची एकूण आवक २८ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ६ क्विंटलने वाढूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक २६५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४ हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
आवक व बाजारभावकांदाएकूण आवक - ८,५०० क्विंटलभाव क्रमांक १ (१,६०० रुपये)भाव क्रमांक २ (१,४०० रुपये)भाव क्रमांक ३ (१,००० रुपये)
बटाटाएकूण आवक - १,५०० क्विंटलभाव क्रमांक १ (२,००० रुपये)भाव क्रमांक २ (१,४०० रुपये)भाव क्रमांक ३ (१,२०० रुपये)
अधिक वाचा: Hapus Mango Market : हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल नंतरच; यंदा हापूस चांगलाच भाव खाणार?