Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव-बारामती बाजार समितीने राज्यात मारली बाजी! 'पणन'ने जाहीर केली क्रमवारी

लासलगाव-बारामती बाजार समितीने राज्यात मारली बाजी! 'पणन'ने जाहीर केली क्रमवारी

Lasalgaon Baramati market committee first in state maharashtra Panan announced ranking | लासलगाव-बारामती बाजार समितीने राज्यात मारली बाजी! 'पणन'ने जाहीर केली क्रमवारी

लासलगाव-बारामती बाजार समितीने राज्यात मारली बाजी! 'पणन'ने जाहीर केली क्रमवारी

महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालनालायमार्फत आर्थिक वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालनालायमार्फत आर्थिक वर्षांच्या कामगिरीच्या आधारावर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालनालयामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षांतील कामगिरीच्या आधारावर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यांतील बारामती बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे. 

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाअंतर्गत  राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. बाजार समित्यांची आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर असून वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राज्याचे पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली. 

दरम्यान, जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच 'स्मार्ट' प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी राज्यातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिध्द करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 


क्रमवारीचा काय होणार फायदा?

बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर झाल्यामुळे इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आपण शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समित्यांमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. बाजार समितीचा विकास करताना नेमक्या कोणत्या बाबींना प्राधान्य द्यायचे याची स्पष्टता यामुळे बाजार समित्यांच्या संचालक मंडळास येणार आहे.

क्रमवारीसाठी काय होत्या अटी?

बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार एकूण ३५ निकष तयार करण्यात आलेले होते. या निकषाशी संबंधित माहितीची संबधित तालुका व जिल्हा स्तरीय समित्यांनी तपासणी करून एकूण २०० गुणांपैकी गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्याची सन २०२२-२३ या वर्षांची क्रमवारी (रॅकिंग) निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये राज्यातील १० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. 


क्रमवारीनुसार राज्यातील पहिल्या १० बाजार समित्या आणि त्यांना मिळालेले गुण

क्रमवारीनुसार राज्यातील पहिल्या १० बाजार समित्या आणि त्यांना मिळालेले गुण
क्रमवारीनुसार राज्यातील पहिल्या १० बाजार समित्या आणि त्यांना मिळालेले गुण

राज्यातील ८ विभागातील प्रथम ३ बाजार समित्या

राज्यातील ८ विभागातील प्रथम ३ बाजार समित्या
राज्यातील ८ विभागातील प्रथम ३ बाजार समित्या

Web Title: Lasalgaon Baramati market committee first in state maharashtra Panan announced ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.