दिवाळीच्या दीर्घ सुटीनंतर लासलगावला कांद्याचे लिलाव आज दिनांक २० नोव्हेंबरला सकाळपासून पूर्ववत सुरू झाल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून लिलाव सुरू झाल्याची माहिती बाजारसमितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. सकाळच्या सत्रात या ठिकाणी उन्हाळ कांद्याचे ५२७ नग (गाड्या) दाखल झाले. तर लाल कांद्याचे २८ नग दाखल झाले. दरम्यान पिंपळगाव बसवंत येथील कांदा लिलावही आज सकाळपासून सुरू झाले आहेत.
लासलगावचे आजचे कांदा बाजारभाव (रु./क्विंटल)
उन्हाळ कांदा : १५०० -४१०१-३७००
लाल कांदा: २०११-४५४५-४०००
विंचूर उपबाजारात असे होते भाव
दरम्यान आज लासलगावची उपबाजार समिती असलेल्या विंचूर येथे सकाळच्या पहिल्या सत्रात ६६१ नग कांद्याच्या गाड्या) कांदा विक्रीसाठी दाखल झाला. त्यात उन्हाळा कांदा ५२०नग, तर लाल कांदा १४१ नग असे प्रमाण होते.
लाल कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे होते (रु./क्विंटल)
किमान - २०००रु.
जास्तीत जास्त. -४४०१रु.
सरासरी - ४१०० रु.
उन्हाळ कांदा बाजारभाव (रु./क्विंटल)
किमान.- १५००
जास्तीत जास्त- ४१००
सरासरी- ३३००
पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजारभाव
उन्हाळी कांदा -२६९९-४०४१-३५५१
लाल कांदा -३७००-५१२५-४०००
दिवाळी सुटीमुळे दिनांक ७ नोव्हेंबर ते दिनांक २० नोव्हेंबर पर्यंत लासलगाव येथील कांदा लिलावाचे व्यवहार बंद होते. याशिवाय पिंपळगाव बसवंत आणि निफाड उपबाजारातील कांदा लिलावही बंद होते. या बंदच्या काळात लासलगावची उपबाजारसमिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी आणणे पसंत केले. त्यामुळे सुटीच्या काळातही येथील कांदा व्यवहारातील उलाढाल वाढल्याचे दिसून आले.