Join us

लाल मिरचीने कुठल्या बाजारसमितीत मिरवला तोरा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 3:29 PM

शनिवार दिनांक २३ मार्च रोजी राज्यातील प्रमुख मिरची बाजारसमित्यांमध्ये लाल मिरचीला काय दर मिळाले ते जाणून घेऊ.

नागपूर बाजारसमितीत शनिवारी लाल मिरचीची ५८४५ क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी बाजारभाव ५ हजार रुपये तर सरासरी बाजारभाव १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असे दिसून आले. त्या आधीचे दोन दिवस नागपूर बाजारसमितीतील लाल मिरचीचे बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.

गडहिंग्लज येथे शंखेश्वरी जातीच्या लाल मिरचीला शनिवार दिनांक २३ मार्च रोजी सरासरी ४५ हजार रुपये बाजारभाव मिळाला. या मिरचीची केवळ २६ क्विंटल आवक झाली होती. दोंडाईचा बाजारसमितीत लाल मिरचीला गुरुवार व शुक्रवार रोजी सरासरी ८८०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव दिसून आला.

सोलापूरमध्ये शनिवारी लोकल वाणाच्या लाल हिरव्या मिरचीला सरासरी साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

राज्यातील लाल मिरचीचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

२३ मार्च २४
सोलापूरलोकल8172000140008500
सांगलीलोकल208140001650015250
नागपूरलोकल485550001500012500
गडहिंग्लजशंखेश्वरी26150006000045000
२२ मार्च २४
दोंडाईचा---488500115708820
भिवापूरहायब्रीड4355000130009000
धर्माबादलोकल84073001800010800
नागपूरलोकल584550001500012500
मुंबईलोकल975230004200032500
दोंडाईचाओली129100073505488
२१ मार्च २४
अहमदनगर---4333001740010350
दोंडाईचा---128125120009200
रामटेक---5160001800016000
शिरपूरहायब्रीड9211128512401
नागपूरलोकल494650001500012500
मुंबईलोकल1296230004200032500
शिरपूरपांडी1125001250012500
दोंडाईचाओली29145064795401
टॅग्स :मिरचीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेती क्षेत्र