Join us

अर्थसंकल्पाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 4:26 PM

आज 01 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 6 हजार 375 क्विंटल इतकी आवक झाली.

आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. यात मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाय शेतकऱ्यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे आज कांद्याला काय भाव मिळाला तर आज लासलगाव बाजारभाव समितीमध्ये काहीसा दिलासादायक दर मिळाल्याचे दिसून आले. काही दिवसांपासून नऊशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळत होता, आज मात्र लासलगाव बाजार समितीत 1360 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. 

आज 01 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 6 हजार 375 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1360 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती जवळपास 12 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर 450 रुपये मिळाला तर सरासरी 1375 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. पिंपळगाव बसवंतबाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 9000 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1250 दर मिळाला. एकूणच काही दिवसांचा बाजारभाव पाहता आज काहीसा शेततकऱ्यांना दिलासा देणारा दर असल्याचे चित्र आहे. आज आवक कमी झाल्याचे बहुधा दरात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले. 

असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---क्विंटल701440018001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21863001100700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल806790015001200
सातारा---क्विंटल131100014001200
येवलालालक्विंटल1200045015001375
धुळेलालक्विंटल192820014501100
लासलगावलालक्विंटल637550014451360
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100070014001200
नागपूरलालक्विंटल100080016001400
नंदूरबारलालक्विंटल11697511751100
सिन्नर - नायगावलालक्विंटल32450013711300
कळवणलालक्विंटल36004001460950
यावललालक्विंटल598450770590
दिंडोरी-वणीलालक्विंटल4246105116061271
वैजापूरलालक्विंटल35845016001000
देवळालालक्विंटल395030013201200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल456230017001000
पुणेलोकलक्विंटल1031950017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1070013001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल7042001000600
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2200110013911250
मंगळवेढालोकलक्विंटल26320017001100
कामठीलोकलक्विंटल16150025002000
नागपूरपांढराक्विंटल820100016001450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल900030015021250
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल5576100018101450
टॅग्स :नाशिकशेतीकांदामार्केट यार्ड