Join us

Onion Market : कांद्याची आवक घटली, सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 6:44 PM

आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 90 हजार क्विंटल आवक झाली.

आज सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 90 हजार क्विंटल आवक झाली. मार्च एंडिंगमुळे आजच्या दिवसापर्यंत  काही बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने आवक कमी झाली आहे. काल दिवसभरात दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली होती. आज लाल कांद्याला सरासरी 950 रुपये ते 1530 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1400 रुपये दर मिळाला. 

आज 02 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज राज्यातील सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची सर्वाधिक 25 हजार 735 क्विंटल इतकी आवक झाली. त्या खालोखाल लोकल कांद्याची पुणे बाजार समितीत 13900 क्विंटल आवक झाली. तर नाशिक आणि राहता बाजार समितीत उन्हाळ कांद्याची अनुक्रमे 2950 क्विंटल आणि 1197 क्विंटल इतकी आवक झाली. एकट्या नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची 2000 क्विंटल आवक झाली. 

आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. काही बाजार समित्यांमध्ये लोकल कांद्याला नऊशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला 1400 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून  ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये तर राहता बाजार समितीत 1200 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे सविस्तर दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/04/2024
कोल्हापूर---क्विंटल357270017001200
जालना---क्विंटल41250021501000
अकोला---क्विंटल529100016001300
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल553130020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8247130018001550
खेड-चाकण---क्विंटल150130017001500
सातारा---क्विंटल260100015001250
हिंगणा---क्विंटल1170017001700
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल846895018101450
कराडहालवाक्विंटल15050012001200
सोलापूरलालक्विंटल2573520021001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल51980018001300
धुळेलालक्विंटल88420018601530
जळगावलालक्विंटल15844251505950
नागपूरलालक्विंटल2480100015001375
नंदूरबारलालक्विंटल1072116513601280
पाथर्डीलालक्विंटल13330016001200
साक्रीलालक्विंटल850050015551300
भुसावळलालक्विंटल43100015001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल335140017501075
पुणेलोकलक्विंटल1390050017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल20100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल21100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल3825001300900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1900115012921250
मलकापूरलोकलक्विंटल95060013501100
जामखेडलोकलक्विंटल8771501650900
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
नागपूरपांढराक्विंटल2000110015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल295075017001400
राहताउन्हाळीक्विंटल119720016501200

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिकशेती क्षेत्र