Join us

लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा पुन्हा घसरण, आज काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 5:17 PM

आज 02 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7 हजार 905 क्विंटल इतकी आवक झाली

एकीकडे देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना भरीव तरतूद करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे निर्यातबंदीनंतर कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरू असून दोन दिवसांपासून दरात काहीशी सुधारणा होत होती. मात्र जैसे थे परिस्थिति असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आजच्या दर अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत सरासरी 1225 रुपये दर मिळाला. 

आज 02 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7 हजार 905 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1225 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. म्हणजे काल दरात सुधारणा झाल्यानंतर आज पुन्हा 135 रुपयांची घसरण झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती जवळपास 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर 300 रुपये मिळाला तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. या बाजार समितीतही 175 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 9000 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1225 दर मिळाला. एकूणच काही दिवसांचा बाजारभाव पाहता आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली. आज आवक पुन्हा वाढल्याने दरात घसरण झाल्याचे दिसून आले. 

असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/02/2024
अकलुज---क्विंटल24530019001000
कोल्हापूर---क्विंटल766840020001200
अकोला---क्विंटल440100016001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल438100017501600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9285100017001350
हिंगणा---क्विंटल4150016001600
येवलालालक्विंटल1000030013761200
येवला -आंदरसूललालक्विंटल1000050014221325
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल60040020001200
धुळेलालक्विंटल104220016501220
लासलगावलालक्विंटल790570013251225
जळगावलालक्विंटल24093121220752
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1100060013911150
नंदूरबारलालक्विंटल11691011751100
सिन्नरलालक्विंटल284030014501250
सिन्नर - नायगावलालक्विंटल39150013911325
चांदवडलालक्विंटल400050215101250
मनमाडलालक्विंटल400030013911150
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल534050013211230
पेनलालक्विंटल351240026002400
पाथर्डीलालक्विंटल7740014001000
भुसावळलालक्विंटल2360012001000
यावललालक्विंटल320450770590
दिंडोरी-वणीलालक्विंटल4606105116061275
देवळालालक्विंटल310030013701225
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल492030017001000
पुणेलोकलक्विंटल1308550017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल6130015001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6800800800
पुणे-मोशीलोकलक्विंटल3434001000700
मंगळवेढालोकलक्विंटल57920015001030
कामठीलोकलक्विंटल34100020001500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल900030015711225
टॅग्स :नाशिककांदामार्केट यार्ड