Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लाल कांद्याची आवक घटली, उन्हाळ कांदा बाजारात, वाचा कुठे-काय बाजारभाव मिळाला? 

Onion Market : लाल कांद्याची आवक घटली, उन्हाळ कांदा बाजारात, वाचा कुठे-काय बाजारभाव मिळाला? 

Latest News 02 Mar 2024 todays onion market price in nashik with maharashtra | Onion Market : लाल कांद्याची आवक घटली, उन्हाळ कांदा बाजारात, वाचा कुठे-काय बाजारभाव मिळाला? 

Onion Market : लाल कांद्याची आवक घटली, उन्हाळ कांदा बाजारात, वाचा कुठे-काय बाजारभाव मिळाला? 

आज बाजार समित्यामध्ये लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

आज बाजार समित्यामध्ये लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

कांदाबाजारभावात मागील दिवसांच्या तुलनेत सद्यस्थितीत समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र अपेक्षित अशा बाजारभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. हळूहळू उन्हाळ कांदा देखील बाजारात येऊ लागला असून या कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अशा शेतकरी करू लागले आहेत. आजच्या दर अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत सरासरी 1740 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. या आठवड्यातील बुधवारी देखील हाच भाव मिळाला होता. 


आज 02 मार्च 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समित्यांचा विचार केला तर केवळ 55 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. याच आठवड्यातील बुधवारी जवळपास एक लाख दहा हजार टनाहून अधिक कांद्याची आवक झाली. त्यामुळे दोन दिवसात पुन्हा निम्म्याहून आवक घटल्याचे दिसून आले. तर राज्यातील सर्वाधिक आवक पिंपळगाव बाजार समितीत 14 हजार क्विंटल इतकी आवक झाली. तर सर्वात खालोखाल लासलगाव विंचूर बाजार समितीत कांद्याची आवक झाली. एकूण मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज आवक घटल्याचे दिसून आले. 

तर आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1740 रुपयांचा बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजार समितीत सरासरी 1300 रुपये बाजारभाव मिळाला. पुणे -पिंपरी बाजार समितीत एकूण 1400 क्विंटल कांद्याची आवक झाली. तर पुणे-मोशी बाजार समितीत सर्वात कमीत बाजारभाव म्हणजेच 1000 रुपयांचा बाजारभाव मिळाला. आज सर्वाधिक बाजारभाव कराड बाजार समितीत हालवा कांद्याला 2000 रुपयांचा बाजारभाव मिळाला. विशेष म्हणजे आज हालवा कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक पाहायला मिळाली. रामटेक बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 5 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1800 तर सरासरी 1900 रुपयांचा बाजारभाव मिळाला. 

असे आहेत राज्यातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/03/2024
कोल्हापूर---क्विंटल928470020001300
अकोला---क्विंटल505120020001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल232060017001150
विटा---क्विंटल30150018001750
कराडहालवाक्विंटल12340020002000
सोलापूरलालक्विंटल828710022001300
येवलालालक्विंटल1200050017961600
येवला -आंदरसूललालक्विंटल500030018261650
धुळेलालक्विंटल117415018501670
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1250070018511700
जळगावलालक्विंटल107855019021312
नागपूरलालक्विंटल1240150020001750
सिन्नर - नायगावलालक्विंटल26350017801650
राहूरी -वांबोरीलालक्विंटल128720019001100
मनमाडलालक्विंटल230050018211550
जामखेडलालक्विंटल197920022001200
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल594060018121675
पेनलालक्विंटल420200022002000
भुसावळलालक्विंटल13100015001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल48050021001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल49650015001000
वाईलोकलक्विंटल1080020001400
शेवगावनं. १नग1130120017001200
शेवगावनं. २नग63090011001100
शेवगावनं. ३नग442300800800
नागपूरपांढराक्विंटल1000160020001900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1400030019351650
रामटेकउन्हाळीक्विंटल5180020001900

Web Title: Latest News 02 Mar 2024 todays onion market price in nashik with maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.