एकीकडे निर्यात करून आणि दुसरीकडे देशांतर्गत निवडक बाजारपेठांमध्ये द्राक्षांची विक्री होत आहे. मात्र तरी देखील शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आजच्या दर अहवालानुसार द्राक्षाला प्रति क्विंटल सरासरी चार हजाराच्या आसपास बाजारभाव मिळाला आहे. तर टोमॅटोचा विचार करता सरासरी 1300 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
असे आहेत द्राक्ष बाजारभाव
आज 02 मार्चच्या दर अहवालानुसार सात बाजार समित्यामध्ये केवळ सहाशे क्विंटल द्राक्षांची आवक झाली. दोन दिवसांपूर्वी जवळपास पाच हजार क्विंटल द्राक्षांची आवक झाली होती. त्यानुसार साडे चार हजार क्विंटलची आवक घटली असे दिसून येत आहे. यात सर्वाधिक आवक ही सोलापूर बाजार समितीमध्ये झाली. या ठिकाणी 3921 नग प्राप्त झाले होते. तर प्रति नगाला सरासरी शंभर रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर सर्वात कमी म्हणजेच 03 क्विंटलची आवक नागपूर बाजार समितीत झाली. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 196 क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 5250 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर जळगाव बाजार समितीत सर्वात कमी म्हणजेच 2500 रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला.
असे आहेत आजचे टोमॅटो बाजारभाव
आज बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या वैशाली, लोकल, हायब्रीड, नंबर 01 या वाणांची आवक झाली. पनवेल बाजार समितीमध्ये नंबर एक वाणाची सर्वाधिक 850 क्विंटलची आवक झाली. राहतासह पुणे -पिंपरी, कामठी, चांदवड आदी बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्याचे दिसून आले. आज पनवेल बाजार समितीत नंबर एक टोमॅटो वाणाला सर्वाधिक क्विंटलमागे सरासरी 1900 रुपयांचा बाजारभाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी 2100 रुपयांचा बाजारभाव मिळाला होता, आज दोनशे रुपयांची घटल्याचे दिसून आले. त्यांनतर सर्वात कमी म्हणेजच अनुक्रमे 700 व 800 रुपये बाजारभाव हा सोलापूर, जळगाव या बाजार समितीत वैशाली वाणाला मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत लोकल टोमॅटोला आठशे रुपये बाजारभाव मिळाला.