Join us

आवक घटली तरीही बाजारभाव जैसे थे, आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 5:33 PM

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले असून कांदा दरात काहीच बदल होताना दिसत नाही.

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले असून कांदा दरात काहीच बदल होताना दिसत नाही. नैसर्गिक संकटानंतरही शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेत कांदा उत्पादन घेतले. मात्र त्यानंतर लागलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आजपर्यंत तळाला गेलेले बाजारभाव अजूनही जैसे थे असल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे. आजच्या बाजार अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत प्रती क्विंटलला 1211 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. 

आज 02 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 6 हजार क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1211 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर मनमाड बाजार समिती जवळपास 2800 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर केवळ कमीत कमी दर 200 रुपये मिळाला तर सरासरी 1150 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 7500 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1225 दर मिळाला. एकूणच काही दिवसांचा बाजारभाव पाहता आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली. आज आवक घटली असली तरीही दरात घसरण झाल्याचे दिसून आले.

असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/02/2024
कोल्हापूर---क्विंटल957840018001200
अकोला---क्विंटल740100016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21303001100700
हिंगणा---क्विंटल2150030003000
कराडहालवाक्विंटल99120016001600
सोलापूरलालक्विंटल5814110020001200
बारामतीलालक्विंटल44750017001100
येवलालालक्विंटल1200030013611150
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल57940019001150
धुळेलालक्विंटल134620016501220
लासलगाव - विंचूरलालक्विंटल870045013401250
जळगावलालक्विंटल30373001300777
धाराशिवलालक्विंटल970013001000
नागपूरलालक्विंटल100080016001400
सिन्नर - नायगावलालक्विंटल43250013111250
राहूरी -वांबोरीलालक्विंटल47902001600900
मनमाडलालक्विंटल280020013921150
कोपरगावलालक्विंटल264050014041300
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल534040012711180
भुसावळलालक्विंटल2470012001000
यावललालक्विंटल1570460780590
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल57943001500900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल4355001000750
मंगळवेढालोकलक्विंटल21925014001050
नागपूरपांढराक्विंटल400100016001450
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल750050015751225

 

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीकांदामार्केट यार्डनाशिक