एकीकडे लाल कांदा बाजारात सुरु असताना हळूहळू आता उन्हाळ कांद्याची आवक वाढू लागली आहे. कालच रामटेक बाजार समितीत 5 क्विंटलची आवक झाली होती. आज लगेचच यात वाढ होऊन 24 क्विंटल उन्हाळ कांदा दाखल झाला. या कांद्याला सरासरी 1500 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर लाल कांद्याला सरासरी 1200 रुपये भाव मिळाला.
आज 03 मार्च रोजीच्या पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज रविवार असल्याने कांद्याची आवक कमी झाली. केवळ दौंड-केडगाव, सातारा, राहता, जुन्नर -आळेफाटा, भुसावळ, पुणे, पुणे- खडकी, पुणे-मोशी, मंगळवेढा, रामटेक या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. आज पुणे बाजार समितीत सर्वाधिक 23 हजार 576 क्विंटलची आवक झाली. या बाजातर समितीत 1200 रुपये बाजारभाव मिळाला. तर पुणे- खडकी बाजार समितीत सर्वात कमी केवळ 10 क्विंटलची आवक झाली. या बाजार समितीतही 1200 रुपये बाजारभाव मिळाला.
तर आज सर्वाधिक 1600 रुपयांचा बाजारभाव दौंड-केडगाव, सातारा, राहता बाजार समितीत बाजारभाव मिळाला. तर आज सर्वात कमी म्हणजेच केवळ 800 रुपयांचा बाजारभाव पुणे-मोशी बाजार समितीत मिळाला. त्यामुळे एकूणच कालचा दर पाहिला असता आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कालपेक्षा आज पुण्यासह इतर बाजार समित्यांच्या बाजारभावात घसरण झाली आहे.
असे आहेत राज्यातील कांदा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
03/03/2024 | ||||||
दौंड-केडगाव | --- | क्विंटल | 6065 | 900 | 2200 | 1600 |
सातारा | --- | क्विंटल | 454 | 1400 | 1800 | 1600 |
राहता | --- | क्विंटल | 2156 | 300 | 2100 | 1600 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 9844 | 1000 | 2410 | 1500 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 50 | 1000 | 1600 | 1200 |
पुणे | लोकल | क्विंटल | 23576 | 600 | 1800 | 1200 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 10 | 1000 | 1400 | 1200 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 721 | 400 | 1200 | 800 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 34 | 400 | 1650 | 1100 |
रामटेक | उन्हाळी | क्विंटल | 24 | 1400 | 1600 | 1500 |