एकीकडे बांगलादेशने लावलेली इम्पोर्ट ड्युटी आणि इस्रायल हमास युद्धामुळे बदलावा लागलेला मार्ग या दोहोंच्या कोंडीत द्राक्ष उत्पादकशेतकरी सापडला आहे. यामुळे दोन्ही कारणांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे साधारण 35 ते चाळीस रुपये किलोने द्राक्ष विक्री करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आज 05 फेब्रुवारी 2024 च्या राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 82 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी तीन हजार तीनशे तर सरासरी पाच हजार 900 रुपये दर मिळाला. मुंबई - फ्रुट मार्केटला केवळ 14 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 5 हजार रुपये तर सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला. अमरावती- फळ आणि भाजीपाला बाजारात 138 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 3 हजार 500 तर सरासरी 4 हजार रुपये दर मिळाला. पुणे बाजारात 539 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 4 हजार तर सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला. बाजारात 539 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या नाशिक बाजार समितीत कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 3 हजार 200 रुपये दर मिळाला. तर सर्वाधिक कमी दर जळगाव बाजार समितीत मिळाला.
असे आहेत राज्यभरातील द्राक्ष बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/02/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 82 | 3300 | 8500 | 5900 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 14 | 5000 | 9000 | 7000 |
सोलापूर | लोकल | नग | 5075 | 40 | 200 | 140 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 110 | 2000 | 4000 | 3000 |
पुणे | लोकल | क्विंटल | 539 | 4000 | 10000 | 7000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 122 | 3000 | 4000 | 3500 |
नाशिक | नाशिक | क्विंटल | 23 | 1600 | 4000 | 3200 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | नाशिक | क्विंटल | 138 | 3500 | 4500 | 4000 |
जळगाव | नाशिक | क्विंटल | 11 | 2000 | 3500 | 2500 |
नागपूर | नाशिक | क्विंटल | 240 | 4000 | 7000 | 6250 |