Lokmat Agro >बाजारहाट > राज्यातील कुठल्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

राज्यातील कुठल्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Latest News 05 march 2024 Todays Onion Market Price in nashik with maharashtra | राज्यातील कुठल्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

राज्यातील कुठल्या बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

राज्यातील बाजार समित्यामध्ये आज लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

राज्यातील बाजार समित्यामध्ये आज लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात..

शेअर :

Join us
Join usNext

कांद्याचा प्रश्न बिकट होत चालला असून बाजारभावामुळे शेतकरी नाराज आहेत. सद्यस्थिती 1600 ते 1700 रुपये सरासरी भाव मिळू लागला आहे. मात्र महिनाभरापूर्वी नऊशे ते हजार, अकराशे अशा बाजारभावानेकांदा विक्री सुरु होती. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1840 रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत आज समाधानकारक भाव मिळाला आहे. 

आज 05 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पस्तीसहून अधिक बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक झाली. आज लाल कांद्यासोबत लोकल, नंबर एक, पोळ, उन्हाळ कांद्याची आवक झाली. विशेष म्हणजे आजच्या दिवसातील सर्वाधिक 1840 रुपयांचा भाव लासलगाव बाजारसमितीमध्ये लाल कांद्याला मिळाला आहे. आज सर्वाधिक 18 हजार क्विंटलची आवक पुणे बाजार समितीमध्ये झाली. म्हणजेच कालच्या तुलनेत आज कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले, मात्र बाजारभावात काहीशी वाढ झाल्याचे समाधानकारक चित्रही पाहायला मिळाले. 

लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7 हजार 633 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1840 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याची 1215 क्विंटल आवक झाली होती. उन्हाळ कांद्याला सरासरी 1750 रुपयांचा बाजारभाव मिळाला. आजच्या दिवसातील सर्वाधिक 2000 रुपयांचा बाजारभाव हा लोकल कांद्याला कामठी बाजार समितीत मिळाला. तर सर्वात कमी म्हणजेच सरासरी 900 रुपयांचा बाजारभाव पुणे मोशी बाजार समितीत मिळाला आहे. 

उन्हाळ कांद्याची आवक वाढली 

दरम्यान लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याची 1215 क्विंटलची आवक झाली. सरासरी 1750 रुपयांचा बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बाजार   समितीत उन्हाळ कांद्याची 400 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1700 रुपयांचा बाजारभाव मिळाला. देवळा बाजार समितीत देखील उन्हाळ कांद्याची 280 क्विंटलची आवक झाली होती. या कांद्याला सरासरी 1500 रुपयांचा बाजारभाव मिळाला. एकूणच उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ होताना दिसते आहे. 

असे आहेत सविस्तर दर.. 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/03/2024
कोल्हापूर---क्विंटल439460019001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल273660022001400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8917130019001600
खेड-चाकण---क्विंटल175140020001700
राहता---क्विंटल210860022001500
येवला -आंदरसूललालक्विंटल300040018701750
धुळेलालक्विंटल120030018001400
लासलगावलालक्विंटल763390019751840
सिन्नरलालक्विंटल230450017601600
सिन्नर - नायगावलालक्विंटल32150017751700
कळवणलालक्विंटल505085017751321
चांदवडलालक्विंटल4000108019391730
मनमाडलालक्विंटल300050018961675
सटाणालालक्विंटल532020018851560
पेनलालक्विंटल468180020001800
पाथर्डीलालक्विंटल4730015001200
दिंडोरी-वणीलालक्विंटल6257110021021681
देवळालालक्विंटल420037017501650
पुणेलोकलक्विंटल1830860018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल7100013001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6150017001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल6256001200900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल350070018201650
कामठीलोकलक्विंटल23150025002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1300040019661725
लासलगावउन्हाळीक्विंटल121550118201750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल400150019701700
देवळाउन्हाळीक्विंटल280100016001500

Web Title: Latest News 05 march 2024 Todays Onion Market Price in nashik with maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.