Join us

Onion Market : लालसह उन्हाळ कांदाही घसरला, राज्यातील बाजार समित्यांत काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 6:27 PM

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 75 हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 75 हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली. मात्र मागील काही दिवसांच्या तुलनेत आज पुन्हा आवकेत घट झाली. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प असल्याने आवक घटली आहे. आज कांद्याला सरासरी 900 रुपयापासून ते 1600 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला. 

आज 06 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले. आज देखील सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक  27 हजार 672 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याखालोखाल नाशिक, लासलगाव-विंचूर, नेवासा  समित्यांमध्ये आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1800 रुपये दर मिळाला. हिंगणा बाजार समितीत सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1800 रुपये दर मिळाला. 

सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1375 रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीत लाल कांद्याला सर्वात कमी म्हणजेच केवळ सरासरी 887 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 1475 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये दर मिळाला. लासलगाव-विंचूर बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे कांदा दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/04/2024
कोल्हापूर---क्विंटल734760018001200
अकोला---क्विंटल851100016001300
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल364130020001600
हिंगणा---क्विंटल2180018001800
सोलापूरलालक्विंटल2767215020001100
बारामतीलालक्विंटल85330016001150
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल51950018001150
धुळेलालक्विंटल123720014401200
जळगावलालक्विंटल26403771367887
धाराशिवलालक्विंटल1380016001200
नागपूरलालक्विंटल1800100015001375
साक्रीलालक्विंटल520045514551200
भुसावळलालक्विंटल49130015001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल1770016001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल37100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल4295001200850
शेवगावनं. १नग720110015001100
शेवगावनं. २नग76060010001000
शेवगावनं. ३नग470250500500
नागपूरपांढराक्विंटल1000110016001475
नाशिकउन्हाळीक्विंटल291075015001350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1600060014701350
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल5382001600900
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल579720015001300
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदानाशिक