Join us

Onion Market : राज्यात कांद्याची पावणे चार लाख क्विंटलची आवक, आज कुठे-काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 8:29 PM

मागील पंधरा ते वीस दिवसांचा विचार करता आज सर्वाधिक 3 लाख 71 हजार 596 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.

मागील पंधरा ते वीस दिवसांचा विचार करता आज सर्वाधिक 3 लाख 71 हजार 596  क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. शनिवारी 4 मे रोजी निर्यात खुली झाल्यानंतर आवकेत वाढ झाली होती. त्यानंतर रविवार असल्याने के दिवस आवक कमी झाली. मात्र आज सोमवारचा दिवस असल्याने पावणेचार लाख क्विंटल कांदा बाजार समित्यांमध्ये दाखल झाला. तर आज कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1900 रुपये दर मिळाला आहे. 

आज 06 मे रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार एकट्या नाशिक जिल्ह्यात 1 लाख 87 हजार क्विंटल इतकी उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर त्या खालोखाल अहमदनगर 75 हजार 491 क्विंटल, सोलापूर 33 हजार क्विंटल, मुंबई 20 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 2 हजार रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये  ते 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला. यानुसार लाल कांद्याची आवक घटली असून निर्यात खुली झाल्यानंतर देखील बाजारभावात काहीसा बदल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक दिसून आली. उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये ते  1900 रुपयांपर्यत दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव? आज लासलगाव बाजार समितीत 1651 रुपये, लासलगाव विंचूरला 1900 रुपये, सिन्नर बाजार समितीत 1550 रुपये, कळवण बाजार समितीत 1400 रुपये, चांदवड बाजार समितीत 1730 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1800 रुपये तर गंगापूर बाजार समितीत 1480 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/05/2024
कोल्हापूर---क्विंटल899470024001500
अकोला---क्विंटल177580018001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल249050015001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल20864160024002000
मंचर- वणी---क्विंटल898140023001850
कराडहालवाक्विंटल150100018001800
सोलापूरलालक्विंटल3331310027001400
बारामतीलालक्विंटल56540021001500
धुळेलालक्विंटल16120018101500
जळगावलालक्विंटल223455016001175
नागपूरलालक्विंटल2080100015001375
साक्रीलालक्विंटल8050125020901775
कुर्डवाडी-मोडनिंबलालक्विंटल30420016001100
हिंगणालालक्विंटल4150020001600
पुणेलोकलक्विंटल1636380022001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4110013001200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल110130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल61150020001250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4200143016011500
वाईलोकलक्विंटल500120023001900
मंगळवेढालोकलक्विंटल7660018101300
कामठीलोकलक्विंटल16150025002000
शेवगावनं. १नग2620160020001600
शेवगावनं. २नग2380100015001500
शेवगावनं. ३नग940300800800
नागपूरपांढराक्विंटल2000110015001400
अहमदनगरउन्हाळीक्विंटल7549120021001650
येवलाउन्हाळीक्विंटल900030020001700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300020017701350
नाशिकउन्हाळीक्विंटल817090019001500
लासलगावउन्हाळीक्विंटल724640023011651
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल28400100024011900
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल18500100021801700
सिन्नरउन्हाळीक्विंटल471050016651550
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल191650019001650
कळवणउन्हाळीक्विंटल2080050021951400
चांदवडउन्हाळीक्विंटल1500069723021730
मनमाडउन्हाळीक्विंटल230048019101550
लोणंदउन्हाळीक्विंटल100090022001400
सटाणाउन्हाळीक्विंटल1485030022551855
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3707550022901800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल934050019001550
गंगापूरउन्हाळीक्विंटल228670020051480
देवळाउन्हाळीक्विंटल675042520801750
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती