Join us

लासलगाव बाजार समितीत काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 5:30 PM

कांदा बाजारभावात होत असलेली घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

एकीकडे केंद्रीय पथक कांद्याची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे. दुसरीकडे कांदा बाजारभावात होत असलेली घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. आज देखील लासलगाव बाजार समिती कांद्याला प्रति क्विंटल 1100 रुपये दर मिळाला. म्हणजेच कालच्या बाजारभावापेक्षा पुन्हा 80 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

आज 06 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 5 हजार 100 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला -आंदरसूल बाजार समिती जवळपास 10 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 200 रुपये मिळाला तर सरासरी 1075 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. नाशिक बाजार समितीत पोळ कांद्याची 2757 इतकी आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1200 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 10 हजार 800 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 425 रुपये तर सरासरी 1050 दर मिळाला. एकूणच काही दिवसांचा बाजारभाव पाहता आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली. 

असे आहेत राज्यभरातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/02/2024
कोल्हापूर---क्विंटल793640016001000
अकोला---क्विंटल440120017001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27313001100700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9976110018001450
खेड-चाकण---क्विंटल20080015001200
दौंड-केडगाव---क्विंटल67540016501200
सातारा---क्विंटल193100016001300
राहता---क्विंटल78920016001150
हिंगणा---क्विंटल2150015001500
कराडहालवाक्विंटल75100014001400
सोलापूरलालक्विंटल5283110020001100
येवला -आंदरसूललालक्विंटल1000020012351075
लासलगावलालक्विंटल510040012561100
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1050050014001175
जळगावलालक्विंटल26204501150800
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200050012201050
पंढरपूरलालक्विंटल17320018001100
नागपूरलालक्विंटल88380016001400
सिन्नर - नायगावलालक्विंटल81650012211100
कळवणलालक्विंटल36004001440850
संगमनेरलालक्विंटल81901511701925
मनमाडलालक्विंटल45002001183900
भुसावळलालक्विंटल4090012001000
यावललालक्विंटल2530460790590
दिंडोरी-वणीलालक्विंटल485390115851241
देवळालालक्विंटल359030012101100
उमराणेलालक्विंटल1050065112771150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल539940016001000
पुणेलोकलक्विंटल1258650017001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल6552001200700
कल्याणनं. १क्विंटल3130015001400
नागपूरपांढराक्विंटल2000100016001450
नाशिकपोळक्विंटल275745015001200
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1080042514011050
रामटेकउन्हाळीक्विंटल7180020001900
टॅग्स :नाशिककांदामार्केट यार्ड