यंदा अनेक शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतातुर आहेत. नाशिक जिल्ह्यातिलक महत्वाचे पीक असलेल्या टोमॅटो आणि द्राक्ष पिकाबाबतही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत सरासरी द्राक्ष तीस ते चाळीस रुपये प्रति किलोने विकली जात आहे. आजच्या दर अहवालानुसार प्रति क्विंटल टोमॅटोला सरासरी 2250 रुपये बाजारभाव मिळाला. तर द्राक्षाला प्रति क्विंटल सरासरी 3500 रुपये बाजारभाव मिळाला. साधारण द्राक्षाला किलोमागे चाळीस रुपये दर मिळाल्याचे चित्र आहे.
टोमॅटोचे आजचे बाजारभाव
आज 07 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार कोल्हापूर बाजार समितीत 192 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2300 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. श्रीरामपूर बाजार समितीत 43 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. पुणे बाजार समितीत 1190 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2250 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. नागपूर बाजार समितीत 200 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 1875 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला.
आजचे द्राक्ष बाजारभाव आज 06 फेब्रुवारी 2024 च्या राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 88 क्विंटल द्राक्षांची आवकझाली. या बाजार समितीत कमीत कमी 2500 तर सरासरी 3500 रुपयांचा दर मिळाला. मुंबई - फ्रुट मार्केटला केवळ 897 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 5 हजार रुपये तर सरासरी 7 हजार रुपये दर मिळाला. पुणे बाजारात 613 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 2500 रुपये तर सरासरी 6 हजार 700रुपये दर मिळाला. या नाशिक बाजार समितीत केवळ 20 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 3 हजार 200 रुपये दर मिळाला.
असे आहेत राज्यभरातील द्राक्ष बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
07/02/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 88 | 2500 | 5500 | 3500 |
मुंबई - फ्रुट मार्केट | --- | क्विंटल | 897 | 5000 | 9000 | 7000 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 9 | 2000 | 2500 | 2300 |
सोलापूर | लोकल | नग | 2880 | 40 | 180 | 100 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 47 | 2000 | 4000 | 3000 |
धाराशिव | लोकल | क्विंटल | 12 | 1500 | 6000 | 3750 |
पुणे | लोकल | क्विंटल | 613 | 2500 | 11000 | 6700 |
नाशिक | नाशिक | क्विंटल | 20 | 1600 | 4000 | 3200 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | नाशिक | क्विंटल | 181 | 3000 | 4000 | 3500 |
जळगाव | नाशिक | क्विंटल | 17 | 2000 | 3500 | 2700 |
नागपूर | नाशिक | क्विंटल | 254 | 4000 | 6000 | 5500 |