Join us

Onion Bajarbhav : उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक, आज काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 8:22 PM

Onion Bajarbhav : गेल्या तीन-चार दिवसांपासून कांदा दरात शेतकऱ्यांना दिलासादायक असा बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

Onion Bajarbhav : गेल्या तीन-चार दिवसांपासून कांदा दरात (Today Onion Rate) शेतकऱ्यांना दिलासादायक असा बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 48000 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सात जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याची (Summer Onion Market) एकट्या नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 96 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 2450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला सर्वाधिक दर हा मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये मिळाला. आज लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीत 2100 रुपये धुळे बाजारात 1900 रुपये हिंगणा बाजार समितीत 2100 रुपये तर साक्री बाजारात सर्वाधिक 2350 रुपयांचा दर मिळाला. 

तर आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2200 रुपये, नाशिक बाजारात 2050 रुपये, लासलगाव बाजारात 2400 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 2451 रुपये, सिन्नर बाजारात सर्वाधिक 2550 रुपये, संगमनेर बाजारात सर्वाधिक कमी 1625 रुपये, सटाणा बाजारात 2315 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/06/2024
अहमदनगर---क्विंटल525140031052200
अहमदनगरउन्हाळीक्विंटल317830029511625
अकोला---क्विंटल203120022001600
अमरावतीलोकलक्विंटल48060020001300
धुळेलालक्विंटल218390024052125
जळगावलालक्विंटल85875025271637
कोल्हापूर---क्विंटल185080031001900
कोल्हापूरलोकलक्विंटल80190023002000
मंबई---क्विंटल13240200029002450
नागपूरलोकलक्विंटल28100020001500
नागपूरलालक्विंटल1210021002100
नाशिकउन्हाळीक्विंटल9666384726332327
पुणे---क्विंटल1385125029002100
पुणेलोकलक्विंटल9625112523251713
पुणेचिंचवडक्विंटल4036100031102000
सांगलीलोकलक्विंटल50150025002000
सातारालोकलक्विंटल20100027002000
सोलापूर---क्विंटल24050030001800
सोलापूरलोकलक्विंटल14460025002000
सोलापूरलालक्विंटल892640036002100
ठाणेनं. १क्विंटल3250027002600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)148444
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकपुणे