Join us

Onion Market : उन्हाळ कांदा दरात पुन्हा घसरण, लासलगाव बाजार समितीत आज काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:30 PM

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याची घसरण झाली असून आवक देखील घटली आहे.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले. काल पावणे चार लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर आज 2 लाख 31 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज सर्वाधिक 1 लाख 75 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तसेच आज सरासरी दर 1200 रुपये ते 1800 रुपये दर मिळाला. कालच्या तुलनेत आज दर घसरल्याचे दिसून आले. 

आज 07 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 900 रुपये ते 1600 रुपये दर मिळाला. आज लाल कांद्याला सरासरी 1062 रुपये ते 1550 रुपये दर मिळाला. लाल कांद्याच्या दरात घसरण झाली असून साक्री बाजार समितीत काल सरासरी 1775 रुपये दर मिळाला आज मात्र 225 रुपयांची घसरण झाली आहे. 

तर आज उन्हाळ कांद्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. शनिवारी निर्यात खुली झाल्याचा निर्णय झाल्यानंतर लासलगाव बाजार समितीत सरासरी 2000 रुपयांचा दर मिळाला होता. रविवारनंतर लागलीच तब्बल 400 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. आज उन्हाळ कांद्याचा दर सरासरी 1600 रुपयांवर आला आहे. लासलगाव विंचूर बाजार समितीत 1800 रुपये, सिन्नर बाजार समितीत 1500 रुपये, चांदवड बाजार समितीत 1650 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1500 रुपये दर मिळाला. आज एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 1 लाख 26 हजार 673 क्विंटलची आवक झाली. 

असे आहेत कांद्याचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/05/2024
अकोला---क्विंटल96580015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23234001400900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल840120017501500
खेड-चाकण---क्विंटल200130020001600
नांदूरा---क्विंटल35500800800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल16410110022101600
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल46870021001400
धुळेलालक्विंटल226620018101500
जळगावलालक्विंटल256752516001062
नागपूरलालक्विंटल1500100015001325
साक्रीलालक्विंटल5300105018801550
भुसावळलालक्विंटल82120015001300
यावललालक्विंटल120124016501440
हिंगणालालक्विंटल2150020002000
पुणेलोकलक्विंटल1597660020001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10170018001750
पुणे-मांजरीलोकलक्विंटल91110020001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल96950020001250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3900124014511350
मलकापूरलोकलक्विंटल197770013601165
कामठीलोकलक्विंटल24150025002000
कल्याणनं. १क्विंटल3190021002000
नागपूरपांढराक्विंटल1500110015001400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200030016251350
नाशिकउन्हाळीक्विंटल801060017001400
लासलगावउन्हाळीक्विंटल428850021511600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल661090019001600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1845085024001800
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1500070021301550
सिन्नरउन्हाळीक्विंटल461750016961500
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल202750017801550
संगमनेरउन्हाळीक्विंटल2038020021001150
चांदवडउन्हाळीक्विंटल1720059121031650
मनमाडउन्हाळीक्विंटल220040017841500
कोपरगावउन्हाळीक्विंटल1192050018601500
कोपरगावउन्हाळीक्विंटल1010050019001625
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3435140020251500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल672060016601400
रामटेकउन्हाळीक्विंटल10140016001500
देवळाउन्हाळीक्विंटल520030020001650
राहताउन्हाळीक्विंटल500160021001650
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीनाशिक