Join us

Wheat Market : बाजारात लोकल आणि शरबती गव्हाचा दबदबा, आज कुठे-काय मिळाला दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 6:37 PM

आज राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत गव्हाची 36 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली आहे.

आज राज्यभरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत गव्हाची 36 हजार क्विंटलपर्यंत झाली आहे. रोजच पन्नास हजार क्विंटलपर्यंत आवक होत असल्याचे पणन मंडळाच्या अधिकृत माहितीवरून दिसून येत आहे. आज गव्हाला सरासरी 2100 रुपयांपासून ते 4600 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. यात लोकल आणि शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळाला आहे. 

आज 08 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण, लोकल, १४७, २१८९, अर्जुन, हायब्रीड, नं. १, पिवळा आणि शरबती आदी वाणांची आवक झाली. आज सर्वाधिक 13308 क्विंटल लोकल गव्हाची आवक मुंबई बाजारात झाली. त्या खालोखाल अमळनेर, अमरावती, नागपूर आदी बाजार समित्यांमध्ये आवक झाली. आज सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2425 रुपये ते 3600 रुपये दर मिळाला. 

तर जळगाव बाजार समितीत आलेल्या १४७ गव्हाला सरासरी 2700 रुपये दर मिळाला. तर २१८९ गव्हाला 2300 रुपये ते 2750 रुपयांपर्यंत दर मिळाला. सिल्लोड बाजार समितीत आलेल्या अर्जुन गव्हाला सरासरी 2500 रुपये दर मिळाला. यावल बाजार आलेल्या हायब्रीड गव्हाला सरासरी 2850 रुपये दर मिळाला. तर याच गव्हाला नेर परसोपंत बाजार समितीत केवळ 2360 रुपये दर मिळाला.  

आज देखील बाजार समित्यांमध्ये लोकल गव्हाचा सर्वाधिक आवक असून त्याचाच दबदबा दिसून आला. लोकल गव्हाला सरासरी 2100 रुपयापासून ते 4450 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर ताडकळस बाजार समितीत नं. १ गव्हाला सरासरी 2500 रुपये दर मिळाला. धारणी बाजार समितीत पिवळ्या गव्हाला सरासरी 2350 रुपये दर मिळाला. तर शरबती गव्हाला सरासरी 3040 रुपये ते 4600 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. 

असे आहेत गव्हाचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/04/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल470220027362550
बार्शी---क्विंटल63350038003600
पाचोरा---क्विंटल1000242031502600
करमाळा---क्विंटल6250025002500
कुर्डवाडी---क्विंटल1330033003300
मोर्शी---क्विंटल401230025502425
राहता---क्विंटल60230025702435
जळगाव१४७क्विंटल111245528002700
वाशीम२१८९क्विंटल600225025902400
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल60225023502300
जामखेड२१८९क्विंटल12250030002750
शेवगाव२१८९क्विंटल151250026502650
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल3260026002600
दौंड-पाटस२१८९क्विंटल32220030002700
सिल्लोडअर्जुनक्विंटल47240026002500
यावलहायब्रीडक्विंटल21258031002850
नेर परसोपंतहायब्रीडक्विंटल19232024002360
अमरावतीलोकलक्विंटल2776245027502600
यवतमाळलोकलक्विंटल190200023702185
चिखलीलोकलक्विंटल115200023002150
नागपूरलोकलक्विंटल1000225024622409
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल29205031752612
मुंबईलोकलक्विंटल13308260065004450
अमळनेरलोकलक्विंटल2500194230113011
चाळीसगावलोकलक्विंटल50232635002450
मुर्तीजापूरलोकलक्विंटल900219529102650
मलकापूरलोकलक्विंटल1580225031452450
दिग्रसलोकलक्विंटल165215033002785
जामखेडलोकलक्विंटल12230027002500
रावेरलोकलक्विंटल42222026002345
दर्यापूरलोकलक्विंटल180220022752250
परांडालोकलक्विंटल3210029002100
काटोललोकलक्विंटल109217026002400
ताडकळसनं. १क्विंटल29210027002500
धारणीपिवळाक्विंटल120230024002350
सोलापूरशरबतीक्विंटल1109255039753040
पुणेशरबतीक्विंटल427400052004600
नागपूरशरबतीक्विंटल1800310035003400
टॅग्स :शेतीमार्केट यार्डगहूसोलापूर