Join us

Onion Market : आज उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 7:45 PM

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये लिलाव बंद असल्याने याचा कांदा आवकेवर परिणाम होत आहे.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक 75 हजार क्विंटलपर्यंत झाली. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये लिलाव बंद असल्याने याचा आवकेवर परिणाम होत आहे. आज कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज सर्वसाधारण, लाल, लोकल आणि उन्हाळ कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये दिसून आली. 

आज 10 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दिवसभरात सर्वाधिक 42 हजार क्विंटलपर्यंत उन्हाळ कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक अहमदनगर जिल्ह्यात दिसून आली. आज लाल कांद्याची आवक 8 हजार क्विंटलपर्यंत झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1000 रुपयापासून ते 1500 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. 

आज लाल कांद्याला सरासरी 1400 रुपयापर्यंत दर मिळाला. धाराशिव बाजार समितीत सर्वाधिक 1425 रुपये दर मिळाला. लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1500 रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला. तर कामठी बाजार समितीत थेट सरासरी 2000 हजार रुपयांचा दर मिळाला. नागपूर     बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला. लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रुपये भाव मिळाला. 

असे आहेत कांद्याचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/04/2024
अकलुज---क्विंटल22530016001000
कोल्हापूर---क्विंटल329160018001200
अकोला---क्विंटल41080016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल15255001300900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7518110016001350
मंचर- वणी---क्विंटल944100015101255
सातारा---क्विंटल172100016001300
हिंगणा---क्विंटल4120015001500
कराडहालवाक्विंटल7580014001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल36950017001100
धुळेलालक्विंटल299020013501100
धाराशिवलालक्विंटल10130015501425
नागपूरलालक्विंटल2000100015001375
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल225140016001000
पुणेलोकलक्विंटल649050015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1370016001150
पुणे-मांजरीलोकलक्विंटल88130017001500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2800115013201270
वाईलोकलक्विंटल1570015001150
मंगळवेढालोकलक्विंटल2330015101100
कामठीलोकलक्विंटल36150025002000
नागपूरपांढराक्विंटल1640110015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल429060014501350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1500070016521400
कोपरगावउन्हाळीक्विंटल560050014421300
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल360720015001300
पारनेरउन्हाळीक्विंटल1420830016001300
भुसावळउन्हाळीक्विंटल35100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल296108013551238

 

टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डनाशिकमहाराष्ट्र