एकीकडे शेतकरी मोठ्या मेहनतीने उन्हाळ कांद्याचे संगोपन करत आहेत. निर्यातबंदीनंतर ज्या पद्धतीने कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे आहे. एवढं करूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कुठेही न डगमगता उन्हाळ कांदा लागवड केली आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल 1090 रुपये बाजारभाव मिळाला. म्हणजेच कालच्यापेक्षा आज 50 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
आज 09 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 9 हजार 401 क्विंटल इतकी आवक झाली तर कमीत कमी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1090 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर सोलापूर बाजार समिती जवळपास 45 हजार 744 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 100 रुपये मिळाला तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. अकोला बाजार समितीत 1345 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 800 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 2000 हजार क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1400 दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 2581 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत सरासरी केवळ 750 रुपये दर मिळाला.