कांदा निर्यात खुली होण्या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र दुसरीकडे कांदा बाजारभाव जैसे थे परिस्थितीत पाहायला मिळत आहे. आज रविवार असल्याने अनेक बाजार समित्या बंद आहेत. काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले आहेत. त्यानुसार राज्यातील बाजार समित्यांमधील बाजारभाव पाहता आज 1300 रुपयांचा सरासरी दर मिळाला.
आज 10 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आठ बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. यात राहता, अकलुज, भुसावळ, पुणे, पुणे- खडकी, पुणे -पिंपरी, पुणे-मोशी आणि मंगळवेढा बाजार समितीत लिलाव पार पडले. त्यानुसार आज सर्वाधिक 25 हजार क्विंटल कांद्याची आवक पुणे बाजार समितीत झाली. त्यानंतर अनुक्रमे राहता 2260 क्विंटल, सातारा 441 क्विंटल, पुणे-मोशी 432 क्विंटल, अकलुज 220 क्विंटल अशी कांद्याची आवक झाली. सर्वात कमी 3 क्विंटलची आवक मंगळवेढा बाजार समितीत झाली.
आजच्या दिवसातील सर्वाधिक 1800 रुपयांचा बाजारभाव अकलुज बाजार समितीत लाल कांद्याला मिळाला. त्या खालोखाल सातारा, राहता, भुसावळ बाजार समितीत 1400 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर सर्वात कमी 950 रुपयांचा बाजारभाव पुणे-मोशी बाजार समितीत लोकल कांद्याला मिळाला. आज केवळ लाल आणि लोकल कांद्याचीच आवक झाली. नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजार समित्या बंद असल्याने लिलावही बंद होते. शिवाय आज उन्हाळ कांद्याची देखील आवक झाली नाही.
कांद्याची खरेदी करण्याची योजना
केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकसाठी यावर्षी पाच लाख टन कांद्याची खरेदी करण्याची योजना आखत आहे, ज्याचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो; मात्र शेतकऱ्यांकडून या निर्णयास कडाडून विरोध होत आहे. मागील वर्षी 'एनसीसीएफ' व 'नाफेड 'मार्फत सात लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला होता. त्यात यंदा दोन लाख टनांनी घट होईल. भूतान, बहरीन व अन्य दोन देशांमध्ये यंदा चार हजार ७५० टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा सरकार आपल्या एजन्सीमार्फतच खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
असे आहेत आजचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
10/03/2024 | ||||||
सातारा | --- | क्विंटल | 441 | 1200 | 1600 | 1400 |
राहता | --- | क्विंटल | 2260 | 300 | 2100 | 1400 |
अकलुज | लाल | क्विंटल | 220 | 350 | 2500 | 1800 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 59 | 1200 | 1600 | 1400 |
पुणे | लोकल | क्विंटल | 25099 | 600 | 1800 | 1200 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 25 | 1000 | 1600 | 1300 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 11 | 700 | 1600 | 1115 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 432 | 700 | 1200 | 950 |
मंगळवेढा | लोकल | क्विंटल | 3 | 900 | 1400 | 1200 |